• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • बापरे! नाक साफ करण्यासाठी कपलनं नाकात घातला लसूण; 20 मिनिटांनी जे घडलं ते किळसवाणं

बापरे! नाक साफ करण्यासाठी कपलनं नाकात घातला लसूण; 20 मिनिटांनी जे घडलं ते किळसवाणं

हन्नाह आणि तिच्या जोडीदाराने लसणाची एक पाकळी सोलून 20 मिनिटांसाठी आपल्या नाकात ठेवली (Couple Puts Garlic Cloves into Nostrils). यानंतर, जेडेनच्या नाकातून एक मोठा बबल बाहेर आला

 • Share this:
  नवी दिल्ली 28 जून : टिकटॉकवर (Tiktok) भारतात बंदी घातली गेली आहे, परंतु तरीही त्याचा वापर परदेशात मोठ्या प्रमाणात केला जात आहे. टेक्सास येथील एका टिकटॉक युजरने (Tiktok User) आपल्या प्रियकरासोबत बनवलेला एक व्हिडिओ (Viral Tiktok Video) शेअर केला आहे. या व्हिडिओनंतर नव्या वादाला सुरुवात झाली आहे. हन्नाह (Hannah) आणि तिचा पार्टनर जेडेन (Jaden) यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, यामध्ये त्यांनी असा दावा केला आहे की लसणाच्या माध्यमातून सायनसवर उपचार करता येतो. परंतु डॉक्टरांनी लोकांना असं न करण्याचा सल्ला दिला आहे. टिकटॉकवरील या 10 सेकंदाच्या व्हिडिओचे फोटो शेअर केले जात आहेत. या व्हिडिओमध्ये, हन्नाह आणि तिच्या जोडीदाराने लसणाची एक पाकळी सोलून 20 मिनिटांसाठी आपल्या नाकात ठेवली (Couple Puts Garlic Cloves into Nostrils). यानंतर, जेडेनच्या नाकातून एक मोठा बबल बाहेर आला हा सायनस असल्याचं तो सांगत आहे. हा सायनस कित्येक दिवस त्याच्या नाकात शिरला होता. लसणाच्या पाकळीच्या वासामुळे ते सहज बाहेर पडले असा दावा या जोडप्याने केला आहे. हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतरच ट्रेंड होण्यास सुरुवात झाली. VIDEO: गप्पा सुरू असतानाच नवरी-नवरेदवाला आठवला कपड्यांना लावलेला माईक; अन्.. या जोडप्याने हा व्हिडिओ त्यांच्या स्वयंपाकघरात बनवला आणि टिकटॉकवर अपलोड केला. हन्नाहनं सांगितलं, की तिचं नाक ब्लॉकड नव्हतं. यामुळे तिच्या नाकातून काहीच बाहेर आलं नाही. पण तिच्या जोडीदारास बऱ्याच दिवसांपासून नाकात काहीतरी अडकल्याचं जाणवत होतं. हेच साफ करण्यासाठी दोघांनीही या ट्रेंडचं अनुसरण केलं. त्यांनी 20 मिनिटांपर्यंत त्यांच्या दोन्ही नाकपुड्यांमध्ये लसणाच्या पाकळ्या ठेवल्या. जेव्हा जेडेननं लसूण बाहेर काढला तेव्हा आतून बरीच घाण बाहेर आली होती. HBD: धुम्रपानामुळं विशाल दादलानी गेला होता नैराश्येत; दिवसाला ओढायचा 40 सिगरेट व्हिडिओ अपलोड होताच व्हायरल झाला. सुमारे 90 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. हा व्हिडिओ ट्रेंड होताच बर्‍याच लोकांनी हे करून पाहाण्यास सुरुवात केली. मात्र, डॉक्टरांनी हे करण्यास लोकांना मनाई केली आहे. डॉक्टरांच्या मते, हे नाकातील सायनस बाहेर काढत नाही. लसणाच्या तीव्र वासामुळे ते नाकाच्या आतील म्यूकस बाहेर काढतं. लसूणात उपस्थित असलेल्या रसायनांमुळे नाकात इन्फेक्शनची भीती आहे. याशिवाय ते नाकात अडकल्यास आणखीच गंभीर परिणाम होतील. त्यामुळे, हे न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: