• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • बापरे! हे काय आहे? बाळाचा VIDEO पाहून आईला फुटला घाम

बापरे! हे काय आहे? बाळाचा VIDEO पाहून आईला फुटला घाम

ते भूत की आणखी काही?

ते भूत की आणखी काही?

हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

 • Share this:
  वॉशिंग्टन, 21 ऑगस्ट : अनेकदा कॅमेऱ्यात असं काही कैद होतं की जे आपल्या तिथं असताना डोळ्यांनी दिसत नाही आणि मग फोटो किंवा व्हिडीओ (Horror video) पाहताना त्यावर आपला विश्वास बसत नाही. आपल्याला धक्काच बसतो (Paranormal Activity). अशाच एका घटनेचा व्हिडीओ (Viral video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे, जो पाहून घाम फुटेल. एका लहान मुलाच्या खोलीत (Child on Cot) विचित्र दृश्यं दिसलं. खतरनाक असा प्रकार खोलीतीली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर मुलाच्या आईने ते पाहिलं आणि तिलाही शॉक बसला. तिने आपल्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा टिकटॉक व्हिडीओ (TikTok Video)  व्हायरल होतो आहे. द सनच्या रिपोर्टनुसार अमेरिकेतील एरिका डेनिअल या महिलेने आपल्या टिकटॉक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिने सांगितलं, आमच्या घरात काही असामान्य घटना घडत असतात. हे वाचा - Horror video : 'ते' भूत की...? Gym मधील हे दृश्य पाहून दरदरून फुटेल घाम व्हिडीओत पाहू शकता, मुलगा पाळण्यात झोपलेला आहेत. त्याला मध्येच जाग येतो. तो पाळण्यात उठून बसतो. तेव्हा तेव्हा पाळण्यातून एक लाइट वरच्या दिशेने जाताना दिसते. त्यानंतर पुढील व्हिडीओत मुलगा पाळण्याच झोपलेला आहे. तो मध्येच दचकतो, तेव्हा त्याचे वडील त्याच्या जवळ जातात तेव्हा मागे असलेल्या पडद्यावरून तशील लाइट जाताना दिसते. हे वाचा - फक्त एक इशारा आणि मुलाचं रडणं बंद; आईने कशी केली जादू पाहा VIDEO याचा संबंध पॅरानॉर्मल अॅक्टिव्हीटीशी जोडला जातो आहे. इथं भूत वगैरे असल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. कुणी या घरात भूत असल्याचं म्हटलं आहे, तर कुणी ही एखादी धूळ किंवा माशी असावी असं म्हटलं आहे.
  Published by:Priya Lad
  First published: