मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO : मंडपातच नवरीनं घातला गोंधळ; 'ती' इच्छा पूर्ण झाल्याशिवाय लग्न करण्यास दिला नकार

VIDEO : मंडपातच नवरीनं घातला गोंधळ; 'ती' इच्छा पूर्ण झाल्याशिवाय लग्न करण्यास दिला नकार

सोशल मीडियावर लग्नातील असे अनेक व्हिडिओ व्हायरल (Wedding Video Viral on Social Media) होताना दिसतात, ज्यात नवरी स्टेजवर येण्याआधी जबरदस्त डान्स (Bride Dance Video) करते

सोशल मीडियावर लग्नातील असे अनेक व्हिडिओ व्हायरल (Wedding Video Viral on Social Media) होताना दिसतात, ज्यात नवरी स्टेजवर येण्याआधी जबरदस्त डान्स (Bride Dance Video) करते

सोशल मीडियावर लग्नातील असे अनेक व्हिडिओ व्हायरल (Wedding Video Viral on Social Media) होताना दिसतात, ज्यात नवरी स्टेजवर येण्याआधी जबरदस्त डान्स (Bride Dance Video) करते

नवी दिल्ली 24 ऑगस्ट : लग्नात नवरीबाईला आपल्या आवडत्या गाण्यावर नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांसमोर एन्ट्री करायला अधिक आवडतं. मंडपात उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांच्या नजरा नवरीच्या एन्ट्रीकडेच (Bride Entry) लागलेल्या असतात. याच कारणामुळे नवरीची एन्ट्री लग्नात सर्वाधिक महत्त्वाची मानली जाते. सोशल मीडियावर लग्नातील असे अनेक व्हिडिओ व्हायरल (Wedding Video Viral on Social Media) होताना दिसतात, ज्यात नवरी स्टेजवर येण्याआधी जबरदस्त डान्स (Bride Dance Video) करताना दिसते.

सध्या असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यात दिसतं, की नवरी मोठ्या उत्साहात लग्नमंडपात एन्ट्री करते खरी पण नंतर ती प्रचंड नाराज होते आणि रागानं लाल होते. या रागाचं कारण केवळ इतकंच असतं, की एन्ट्रीच्या वेळी तिचं आवडतं गाणं लावलं गेलं नाही. याच कारणामुळे नवरी रागावते आणि तिथेच उभा राहते.नवरीला आपल्या एन्ट्रीमध्ये काहीही कमी नको होती, त्यामुळे तिला राग आला.

Bikini घालून बीचवर करत होती योगा; तरुणीसोबत असं काही घडलं की पाहून बसेल धक्का

नवरीला शांत करण्यासाठी शेजारीच उभा असलेला भाऊ तिला समजवायला पुढे येतो आणि तिला सांगतो, की थोडी वाट बघ सगळं ठीक होईल. मात्र, आपली एन्ट्री खराब झाल्याचं दुःख या नवरीच्या मनात असतं. तिला सर्वांच्या समोर पहिल्यांदा आपल्या आवडीच्या गाण्यावर डान्स करायचा होता. काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ लोकांच्या पसंतीस उतरत आहे.

ऐन लग्नात भडकली नवरी, नवरदेवाजवळ जायलाच तयार नाही; काय झालं ते VIDEO मध्ये पाहा

सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर द वेडिंग ब्रिगेड नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या पसंतीस उतरत आहे. हा व्हिडिओ शेअर करत याला कॅप्शन देण्यात आलं आहे, की व्हिडिओ पाहून जाणून घ्या की नवरीनं वेन्यूमध्ये जाण्यात नकार का दिला. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत आपली प्रतिक्रियाही दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Bride, Wedding video