‘बहामाहूपयोगी’ या ट्विटर युझरने हा व्हिडओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये समुद्रकिनारी महिला योगा करताना दिसते आहे. हे वाचा - त्यानंतर तो कधीच सेक्स करू शकला नाही; बायकोवर केलेला 'तो' प्रयोग महागात महिला योगा करण्यात दंग असताना अचानक तिच्या जवळ कुणीतरी सरपटत येत असल्याचं दिसतं आहे. सरपटत येणारा हा प्राणी तिच्या हाताला जोरात चावतो (Iguana big lizard bite woman). महिला योगाच्या अशा मुद्रेत होती, ज्यामुळे तिला आपल्याजवळ कुणीतरी येत आहे, याची कल्पनाही नव्हती. अचानक कुणीतरी चावल्याने तीसुद्धा घाबरते. वेदनेने कळवळते. महिला तेथेच आरडोओरडा सुरू करते. त्यानंतर ती त्या प्राण्याला पळवण्याचा प्रयत्न करते. त्याच्यावर वाळू टाकते आणि तो तिथून पळून जातो. आता हा प्राणी म्हणजे इगुआना (Iguana) आहे. जी एक मोठी पालच असते. हे वाचा - ऐन लग्नात भडकली नवरी, नवरदेवाजवळ जायलाच तयार नाही; काय झालं ते VIDEO मध्ये पाहा या घटनेनंतर ट्विटर युझरने आपल्या अकाऊंटचं नाव बदलून ‘द इगुआना गर्ल’ (The Iguana Girl) असं ठेवलं आहे. कारण या महिलेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.I get bite from an iguana today it was bleeding pic.twitter.com/If2DaUztHf
— Da Iguana Gal (@bahamahoopyogi) August 20, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral