जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पाठवणीवेळी अचानक उड्या मारू लागली नवरी; पाहून नवरदेवही हैराण, लग्नातील Video Viral

पाठवणीवेळी अचानक उड्या मारू लागली नवरी; पाहून नवरदेवही हैराण, लग्नातील Video Viral

पाठवणीवेळी अचानक उड्या मारू लागली नवरी; पाहून नवरदेवही हैराण, लग्नातील Video Viral

सध्या सोशल मीडियावर लग्नमंडपातील एक व्हिडिओ व्हायरल (Wedding Video Viral) होत आहे. यात नवरी मस्तीच्या मूडमध्ये असून तिचा वेगळा अंदाज पाहून पाहुणेही हसू लागले.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 21 सप्टेंबर : आपल्या लग्नात प्रत्येक क्षण एन्जॉय करावा अशी प्रत्येक नवरीची आणि नवरदेवाची (Bride and Groom) इच्छा असते. त्यामुळे लग्नातील प्रत्येक क्षणी पाहुणेही त्यांना अतिशय खास असल्यासारखंच वागवतात. इतकंच नाही तर लग्नातील पाहुणे नवरी आणि नवरदेवाच्या प्रत्येक लहान-लहान हालचालींवरही नजर ठेवतात. लग्नात आलेल्या पाहुण्यांच्या नजरा नवरी-नवरदेवाकडेच लागलेल्या असतात. सध्या सोशल मीडियावर लग्नमंडपातील असाच एक व्हिडिओ व्हायरल (Wedding Video Viral) होत आहे. यात नवरी मस्तीच्या मूडमध्ये असून तिचा वेगळा अंदाज पाहून पाहुणेही हसू लागले. या घटनेमुळे मंडपातच बदलला नवरीचा विचार, प्रियकराला सोडून एक्स बॉयफ्रेंडसोबत फरार लग्नाच्या वेळी नवरीबाई एकदम शांत आणि लाजत उभा असल्याचं तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. मात्र, आताच्या नवऱ्या या आधुनिक काळानुसार बऱ्याच बदलल्या आहेत. त्या आता आपल्या लग्नात होणारे सर्व कार्यक्रम एन्जॉय करताना दिसतात. असंच काहीसं सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Funny Video of Bride) पाहायला मिळतं. व्हिडिओमध्ये दिसतं, की जेव्हा लग्नानंतर पाठवणीची वेळ येते तेव्हा नवरीच्या हातात लाह्या दिल्या जातात. सासरी जाण्याआधी नवरी आपल्या हातानं या लाह्या मागे फेकत असते. मात्र या व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरी जोराने या लाह्या हवेत फेकते आणि उडी मारते. यानंतर ती जोरजोरानं हसू लागते.

जाहिरात

अरे बापरे! केस पेटत होते तरी ती काम करत राहिली आणि…; पाहा धक्कादायक VIDEO नवरीची ही मस्ती पाहून काही वेळासाठी नवरदेवही अवाक होतो आणि तिच्याकडे पाहू लागतो. मात्र, नवरीला हसताना पाहून नंतर सगळेच हसू लागतात. काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Instagram Reels Video) चांगलाच व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर निरंजन महापात्रा यांनी आपल्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला अनेक लाईक मिळत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये अनेक हॅशटॅग देण्यात आले आहेत. अनेकांनी या व्हिडिओ कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात