जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अरे बापरे! केस पेटत होते तरी ती काम करत राहिली आणि...; पुढे काय घडलं पाहा धक्कादायक VIDEO

अरे बापरे! केस पेटत होते तरी ती काम करत राहिली आणि...; पुढे काय घडलं पाहा धक्कादायक VIDEO

अरे बापरे! केस पेटत होते तरी ती काम करत राहिली आणि...; पुढे काय घडलं पाहा धक्कादायक VIDEO

केस पेटत असताना महिला कामात व्यस्त राहिली पुढे असं झालं की…

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 सप्टेंबर :  अनेकदा कपड्यांना आग (Fire video) लागल्यावर आपल्याला पटकन समजत नाही. पण सध्या सोशल मीडियावर (Social media) असा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे, ज्यात एका महिलेच्या केसांनाच आग (Fire on hair video) लागली आहे. महत्त्वाचं म्हणजे या महिलेला त्याची माहिती नाही आणि केस पेटत असताना ती मात्र आपल्या कामात व्यस्त आहे (Woman hair caught fire in kitchen). आगीचा हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. किचनमध्ये काम करता करता महिलेच्या केसांना आग लागली. महिलेला ते समजलंच नाही. हळूहळू तिचे संपूर्ण केस पेटले. व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत.

जाहिरात

@Jamie24272184 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता, महिला आरामात किचनमध्ये काम करते आहे. यावेळी ती काहीतरी सामान घेण्यासाठी गॅससमोर खाली वाकते. त्याचवेळी तिच्या केसांना आग लागते. महिलेचे केस पेटले पण तिला याची माहितीच नाही. अशाच आग लागलेल्या केसांसोबत ती काम करताना दिसते. बऱ्याच वेळानंतर महिलेला एका काचेत तिच्या केसांना आग लागल्याचं दिसतं तेव्हा ती आपल्या केसांवर हात मारते आणि आग विझवते. हे वाचा -  Shocking Video : ट्यूशनला जाणाऱ्या विद्यार्थ्याला मागून येणाऱ्या ट्रकने चिरडलं याआधीसुद्धा डिसेंबर 2020 मध्ये केसांना आग लागल्याचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.  गायिका सोफिया एलारचे (singer sofia ellar) हा व्हिडीओ होता. ती आपल्या बॉयफ्रेडसह ख्रिसमस एन्जॉय करत होती.  दोघंही एकत्र ख्रिसमस कॅरोल (Christmas Carol) गात होते. तेव्हा अचानक सोफियाच्या केसांना आग (Hair On Fire)  लागली. सोफियान आपल्या इन्स्टाग्रामवर (Instagram) हा व्हिडीओ शेअर केला होता.

व्हिडीओत पाहू शकता,  सोफिया बॉयफ्रेंड अल्वारो सोलरच्या समोर बसली आहे. अल्वारो ख्रिसमस कॅरोल गायला सुरुवात करतो आणि सोफिया त्याला साथ देते. गाणं गाता गाता ती पुढे मागे होते. तिच्या पाठीमागे टेबलवर मेणबत्त्या पेटत असतात. सोफियानं केस सोडलेले आहेत. जेव्हा ती मागे होते तेव्हा तिचे केस पेटत्या मेणबत्तीला लागतात आणि त्यांना आग लागते. सुरुवातीचे काही क्षण सोफियालाही समजत नाही की तिच्या केसांना आग लागली आहे. हे वाचा -  विचित्र प्रथा! इथे लग्नाआधी नवरीला करावं लागतं टक्कल; कारण वाचून व्हाल थक्क मागे काहीतरी गरम लागल्यासारखं वाटतं  तेव्हा ती मागे वळून पाहते तर तिच्या केसांनी पेट घेतलेला असतो. मग दोघंही आग विझवण्याचा प्रयत्न करतात. सुदैवाने सोफिया आणि अल्वारोचं वेळीच लक्ष जातं आणि ते लोक आग लगेच विझवतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात