• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • प्रियकरासोबत लग्नगाठ बांधत होती तरुणी; 'या' घटनेमुळे मंडपातच बदलला विचार अन् एक्स बॉयफ्रेंडसोबत झाली फरार

प्रियकरासोबत लग्नगाठ बांधत होती तरुणी; 'या' घटनेमुळे मंडपातच बदलला विचार अन् एक्स बॉयफ्रेंडसोबत झाली फरार

लग्नाच्या मंडपात शांतता पसरली जेव्हा नवरीच मंडपातून फरार झाली. 24 वर्षीय सिएरिया आपल्या 28 वर्षीय बॉयफ्रेंड सॅमसोबत लग्नगाठ बांधत होती

 • Share this:
  नवी दिल्ली 21 सप्टेंबर : कोणत्याही कपलसाठी (Couple) त्यांच्या लग्नाचा दिवस (Wedding Day) अतिशय खास असतो. कारण हा दिवस त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस ठरत असतो. नवरी आणि नवरदेव आपल्या या खास दिवसासाठी विशेष तयारी करतात. मात्र, याचदिवशी विचित्र काही घडलं की पाहुण्यांचाही (Guests in wedding) हिरमोड होतो. असंच काहीसं घडलं अमेरिकेत राहणाऱ्या एका कपलच्या (American Couple) लग्नावेळी. या लग्नात असं काही झालं की सोशल मीडियावर (Social Media) याची चर्चा रंगली. बाबो! विराटची लंबोर्गिनी गॅलार्डो स्पायडर विकली जाणार; किंमत बघून व्हाल थक्क अमेरिकेच्या मेरीलँडमध्ये लग्नाच्या मंडपात शांतता पसरली जेव्हा नवरीच मंडपातून फरार झाली. 24 वर्षीय सिएरिया आपल्या 28 वर्षीय बॉयफ्रेंड सॅमसोबत लग्नगाठ बांधत होती. ती आणि तिचा बॉयफ्रेंड दोघंही ट्रॅव्हलर आहेत आणि त्यांना सतत फिरत राहणं आवडतं. दोघंही बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या दिवशी सॅम दारूच्या नशेत मंडपात पोहोचल्याचं पाहून सिएरियाचा मूड खराब झाला. यानंतर तिनं लगेचच ठरवलं की ती सॅमसोबत लग्न करणार नाही. याच लग्नात सिएरियाचा एक्स बॉयफ्रेंड असलेला चुलत भाऊदेखील आलेला होता. त्यानंच सिएरियाला समजवालं की तिनं सॅमसोबत लग्न नाही करायला पाहिजे आणि आपल्यासोबत पळून जाण्याचा सल्ला दिला. सिएरियालाही कायलीचं हे म्हणणं पटलं आणि तिनं मंडपातून त्याच्यासोबत पळ काढला (Bride run off with Ex Boyfriend) . डेली स्टारनं दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा सिएरियानं कायलीला लग्नासाठी आमंत्रण दिलं तेव्हा सॅमनं याचा विरोध केला होता. कायलीनं या लग्नात यावं अशी सॅमची इच्छा नव्हती. पप्पा, मला टॉर्चर करणं बंद करा! प्रेमाला विरोध करणाऱ्या वडिलांना लेकीचा संदेश 21 वर्षीय कायलीनं सिएरियाला म्हटलं, की सॅमची ही अवस्था पाहून त्याला तिची दया येत आहे. त्यानं म्हटलं, की तू तुझं संपूर्ण आयुष्य सॅमसारख्या व्यक्तीसोबत घालवावं असं मला वाटत नाही. यानंतर कायली आणि सिएरिया यांनी लग्नमंडपातच एकमेकांना किस केलं आणि यानंतर दोघंही फरार झाले. ही संपूर्ण किस्सा अमेरिकी टीव्ही शो जिप्सी ब्राईड्सचा आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: