Home /News /viral /

VIDEO : महिलेनं ऑनलाईन ऑर्डर केलं सामान, मात्र बॉक्स घेऊन पळालं अस्वल; पाहा यात असं नेमकं काय होतं?

VIDEO : महिलेनं ऑनलाईन ऑर्डर केलं सामान, मात्र बॉक्स घेऊन पळालं अस्वल; पाहा यात असं नेमकं काय होतं?

महिला क्रिस्टिन लेविन जेव्हा आपली ऑर्डर घेण्यासाठी बाहेर गेली तेव्हा तिला हा ब़ॉक्स तिथे दिसला नाही. तिला असं वाटलं, की तिची ही ऑर्डर कोणीतरी चोरी केली आहे.

    नवी दिल्ली 26 ऑगस्ट : अनेकदा अशा काही घटना घडतात ज्यांच्याबद्दल ऐकूनच लोक हैराण होतात. अमेरिकेच्या कनेक्टिकट (Connecticut) येथील ब्रिस्टलमध्येही (Bristol) एक अशीच घटना घडली, जी हैराण करणारी आहे. एका महिलेनं आपल्या घराच्या पत्त्यावर अॅमेझोनवरून (Amazon) काहीतरी ऑर्डर केलं, मात्र डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) घराच्या बाहेरच ऑर्डर (Online Order) ठेवून निघून गेला. यादरम्यान तिथे एक काळं अस्वल आलं आणि हा बॉक्स घेऊन गेलं. 1500 वर्षांपूर्वी मिठी मारली अन् दोघांनी सोडला जीव, आज सापडले सांगाडे! ब्रिस्टल येथील महिला क्रिस्टिन लेविन जेव्हा आपली ऑर्डर घेण्यासाठी बाहेर गेली तेव्हा तिला हा ब़ॉक्स तिथे दिसला नाही. तिला असं वाटलं, की तिची ही ऑर्डर कोणीतरी चोरी केली आहे. महिलेनं चोरीच्या संशयातून जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा हैराण करणारं दृश्य तिला दिसलं. महिलेला दिसलं, की तिचं अॅमेझोनचं हे पार्सल एक काळ्या रंगाचं अस्वल घेऊन पळालं आहे. या पॅकेटमध्ये काहीही महागाचं सामान नव्हतं तर काही टॉयलेच पेपर रोल होते. भयंकर! मेल्यानंतर 20 मिनिटांनी नाग झाला जिवंत; शेफला दंश; वाचून अंगावर येईल काटा महिलेनं जेव्हा या पॅकेजचा शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा समजलं की अस्वलानं हे पॅकेज शेजारीच टाकलं होतं. यानंतर क्रिस्टिननं आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन एक व्हिडिओदेखील पोस्ट केला. हा व्हिडिओ (Viral Video on Social Media) पोस्ट करत महिलेनं लिहिलं, की या व्यक्तीनं माझं पॅकेज उचललं. चोरीच्या सामानाच्या बदल्यात अॅमेझोन रिप्लेसमेंट देत का? इंटरनेटवर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ 5 हजारहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. लोकांना जेव्हा माहिती झालं, की या पॅकेजमध्ये टॉयलेट पेपर होते तेव्हा लोकांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Funny video, Video Viral On Social Media

    पुढील बातम्या