मराठी बातम्या /बातम्या /Viral /

प्रेम म्हणजे प्रेम असतं! 1500 वर्षांपूर्वी मिठी मारली अन् दोघांनी सोडला जीव, आज सापडले सांगाडे!

प्रेम म्हणजे प्रेम असतं! 1500 वर्षांपूर्वी मिठी मारली अन् दोघांनी सोडला जीव, आज सापडले सांगाडे!

त्याच्या हाताचं हाड मोडलं असून, उजव्या हाताचं एक बोट गायब होतं आणि उजव्या पायाचं हाडही तुटलेलं होतं. महिलेचं वय 35 ते 40 वर्षांच्या दरम्यान असून...

त्याच्या हाताचं हाड मोडलं असून, उजव्या हाताचं एक बोट गायब होतं आणि उजव्या पायाचं हाडही तुटलेलं होतं. महिलेचं वय 35 ते 40 वर्षांच्या दरम्यान असून...

त्याच्या हाताचं हाड मोडलं असून, उजव्या हाताचं एक बोट गायब होतं आणि उजव्या पायाचं हाडही तुटलेलं होतं. महिलेचं वय 35 ते 40 वर्षांच्या दरम्यान असून...

  • Published by:  sachin Salve

चीन, 25 ऑगस्ट : जगभरात अनेक रहस्यमय, आश्चर्यकारक गोष्टी आहेत. हजारो वर्षांनतर समोर येणाऱ्या अनेक गोष्टी मानवी बुद्धीला थक्क करणाऱ्या असतात. हजारो वर्षांपासून मानवी संस्कृती अस्तित्वात होती, याचे पुरावे आजही भूगर्भातल्या उत्खननात आढळत असतात.   त्यामुळे पुरातत्त्वशास्त्रासाठी (Archaeology) अशा गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. चीनमधल्या (China) पुरातत्त्वशास्त्रज्ञांना नुकत्याच सापडलेल्या 1500 वर्षांपूर्वीच्या दोन मानवी सांगाड्यांनीही (1500 years old skeletons) शास्त्रज्ञांनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे. स्त्री-पुरुषांचे हे प्राचीन सांगाडे अमर प्रेमाची कथा सांगत असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

उत्तर चीनमध्ये (Northern China) शांजी प्रांतात एका बांधकामादरम्यान एक स्मशानभूमी (Graveyard) खोदण्यात आली. त्या वेळी 1500 वर्षं जुने असलेले दोन सांगाडे सापडले. एक स्त्री (Female Skeleton) आणि एक पुरुष (Male Skeleton) अशा दोन व्यक्तींचे हे सांगाडे असून, ते आलिंगन दिलेल्या स्थितीत आढळले आहेत. हीच अतिशय वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. पुरुष आणि स्त्रियांना एकत्र दफन करणं आणि तेही आलिंगन दिलेल्या रूपात, ही सामान्य गोष्ट नाही, असं शास्त्रज्ञ म्हणतात.

नाव कमावलं पण वसुलीनं गमावलं; पबमध्ये घुसून वसुली करणे पडले पोलिसाला भारी

चीनमध्ये प्रथमच अशा पद्धतीचे सांगाडे आढळले असून, या सांगाड्यांनी त्या काळातल्या समाजामधल्या प्रेमाची विचारसरणी दर्शविली आहे. पुरात्त्वशास्त्रात क्वचितच असं अमर प्रेमाचं उदाहरण आढळलं आहे, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. हे सांगाडे उत्तर व्ही राजवटीच्या दरम्यान इसवी सन 386 ते 534 च्या दरम्यान दफन करण्यात आले असावेत, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. जून महिन्यात प्रकाशित झालेल्या इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऑस्टियोआर्किओलॉजीच्या (International Journal of Osteoarcheology) अंकात या सांगाड्यांबद्दलची माहिती देण्यात आली आहे.

कियारा अडवानी की मलायका! जिम लुकमध्ये या 7 पैकी कोणती अभिनेत्री दिसते जास्त हॉट?

यातला पुरुष सांगाडा सुमारे 5 फूट 4 इंच उंचीचा असून, तो 29 ते 35 वर्षं वयाच्या दरम्यान मरण पावला असावा. त्याच्या हाताचं हाड मोडलं असून, उजव्या हाताचं एक बोट गायब होतं आणि उजव्या पायाचं हाडही तुटलेलं होतं. महिलेचं वय 35 ते 40 वर्षांच्या दरम्यान असून, तिची उंची 5 फूट 2 इंच आहे. त्या पुरुषाच्या मृत्यूनंतर, तिनेही आपला जीव दिला असावा. मृत्यूनंतर दुसऱ्या जगात प्रेम टिकवून ठेवण्यासाठी, या पती-पत्नीने असा निर्णय घेतला असावा, जेणेकरून ते पुढील आयुष्यातही एकत्र राहतील, असा कयास बांधला जात आहे.

Link :

First published: