• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • कोब्राचा बदला! डोकं छाटून टाकल्यानंतरही 20 मिनिटांनी जिवंत झाला नाग; शेफला केला दंश; वाचून अंगावर येईल काटा

कोब्राचा बदला! डोकं छाटून टाकल्यानंतरही 20 मिनिटांनी जिवंत झाला नाग; शेफला केला दंश; वाचून अंगावर येईल काटा

कोब्राला मारल्यानंतर 20 मिनिटांनी कोब्राने या शेफला दंश केल्यानं सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

 • Share this:
  चीनमध्ये (China) वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी खाणं (Weird Foods in China) ही सर्वसामान्य बाब आहे. उंदीर (Rats), वटवाघूळ (Bats), साप (Snake), झुरळ असे अनेक प्राणी तिथं खाल्ले जातात. काही प्राण्यांपासून बनवल्या जाणाऱ्या विशेष पदार्थांना तर चिनी खाद्यसंस्कृतीत खूपच महत्त्व आहे. यातीलच एक पदार्थ म्हणजे कोब्रा नागाचे सूप (Cobra Soup). एक दुर्मीळ पदार्थ म्हणून याची ओळख आहे. हा पदार्थ बनवण्याची संधी मिळाली की ते बनवणारे शेफही खुश असतात. कोब्राचे सूप बनवण्याची संधी मिळाली म्हणून खूष असणाऱ्या एका शेफला (Chef) मात्र आपला जीव गमवावा लागला आहे. दक्षिण चीनमध्ये (South China) ही विचित्र घटना घडली असून, कोब्राला मारल्यानंतर 20 मिनिटांनी कोब्राने या शेफला दंश केल्यानं सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. टाईम्स नाऊ हिंदी डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण चीनमधील एका रेस्टॉरंटमध्ये एका ग्राहकाने कोब्रा नागाच्या सूपची ऑर्डर दिली. तेव्हा शेफ पेंग फॅन यांना दुर्मीळ पदार्थ करण्याची संधी मिळाल्याचा आनंद झाला. त्यांनी इंडोचायनीज कोब्रा नाग (Cobra) घेतला आणि त्याचे डोके छाटून टाकलं आणि ते पुढची पाकक्रिया करायला वळले. 20 मिनिटांत सूप तयार झालं आणि शेफ पेंग फॅन किचनची साफसफाई करू लागले. इथंच त्यांचे दुर्दैव आड आले. त्यांनी सूप करण्यापूर्वी कोब्राचे छाटून टाकलेलं डोकं कचऱ्यात टाकण्यासाठी उचलले आणि त्याच क्षणी त्या कोब्राने त्यांना दंश केला. नागाच्या विषात न्यूरोटॉक्सिन (Neuro Toxin) असल्यानं ते अतिशय धोकादायक असते, अर्ध्या तासात माणसाचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळं पेंग फान यांच्यावरही काही उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हे वाचा - कुटुंबाचं सुरू होतं एकत्र जेवण, अचानक कोसळला सिलिंग फॅन, पाहा भयानक VIDEO याबाबत माहिती देताना या घटनेचे साक्षीदार लिन सन म्हणाले की, ‘पत्नीच्या जन्मदिनानिमित्त आम्ही या रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी आलो होतो. जेवणाचा आस्वाद घेत असतानाच अचानक किचनमधून किंचाळण्याचे, ओरडण्याचे आवाज येऊ लागले. आम्हाला काहीच कळत नव्हते की आतमध्ये काय चालले आहे? घाईनं एका डॉक्टरांना बोलावण्यात आलं; पण डॉक्टर येईपर्यंत उशीर झाला होता. शेफ पेंग फान मरण पावले होते. ’ यापूर्वीही सापाने, नागाने शेफना दंश करण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र मारलेल्या कोब्राचं डोकं 20 मिनिटांनंतरही जिवंत असल्यानं आणि त्यानं दंश केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. परंतु, सापाचे किंवा नागाचे डोके (Cobra’s Head) देहापासून वेगळे झाले तरी ते किमान एक तासभर जिवंत असते. काही वेळा ते त्यापेक्षाही अधिक काळ जिवंत राहू शकते त्यामुळे दक्षता घेणं आवश्यक आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published: