नवी दिल्ली 28 सप्टेंबर : आजकाल प्रत्येकाला काहीतरी वेगळं आणि तुफानी करून दाखवायचं असतं. यात अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचाच समावेश आहे. मात्र, काहीतरी वेगळं करण्याच्या नादात अनेकदा अशा काही घटना घडतात ज्या पाहून सगळेच थक्क होतात. तर, काही घटना हसायला भाग पाडणाऱ्या असतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ (Funny Video) पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की लहान मुलं खेळाखेळातच असं काही करून जातात ज्यामुळे त्यांना दुखापत होते. मात्र, लहान मुलांना एखादी गोष्ट करण्यापासून कितीही अडवलं तरीही शेवटी ते स्वतःच्या मनाचंच करतात. सध्या अशाच एका मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात आपली मस्ती या मुलाला चांगलीच महागात पडल्याचं दिसतं.
तरुणाच्या पार्श्वभागात झाला ब्लास्ट आणि निघाला धूर; नेमकं काय घडलं पाहा VIDEO
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Stunt Video Viral) तुम्ही पाहू शकता, की काही लहान मुलं फावडीच्या साहाय्याने स्लाइड घेण्याचा प्रयत्न करतात. पण मुलांची ही अनोखी मस्ती त्यांनाच महागात पडते. जेव्हा यातील एक मुलगा स्लाइड करत असतो तेव्हा सरकताना खाली येतो आणि एका मोठ्या दगडावर आदळतो. यामुळे त्याला चांगलीच दुखापत होते. व्हिडिओच्या शेवटी मुलांनादेखील ही गोष्ट समजते की त्यांनी मोठी चूक केली आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर हा विनोदी व्हिडिओ (Funny Stunt Video on Social Media) नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. अनेक यूजर्सनी यावर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरनं म्हटलं, की लहानपणी अशा पद्धतीची मस्ती आम्हीदेखील करायचो. दुसऱ्या एका यूजरनं लिहिल, की मुलांची ही मस्ती पाहून मला हसू आवरत नाहीये. आणखी एकानं लिहिलं, की पुढच्या वेळी स्टंट करण्याआधी ही मुलं शंभर वेळा विचार करतील.
महिलेला आवडत नव्हतं शरीराचं हे अंग; विचित्र प्रयोग पडला महागात, आता अशी अवस्था
इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ ‘vip_tashan_’ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. याचा अंदाज तुम्ही या गोष्टीवरुन लावू शकता की बातमी देईपर्यंत या व्हिडिओला 3 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.