नवी दिल्ली 13 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा अशा घटना व्हायरल होत राहतात, ज्या ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल. सध्या अशीच एक घटना चर्चेचा विषय ठरली आहे. खरं तर ही एका गुन्ह्याची बातमी (Crime News) आहे, मात्र तरीही ती विनोदी (Funny) आहे. विचार करा, की एखाद्या बँकेत चोर (Thief) चोरी (Bank Theft) करण्यासाठी आला आहे, मात्र बँकेतील कर्मचाऱ्यांना हेच समजलं नाही की हा व्यक्ती नेमका कोणत्या उद्देशानं आला आहे, तर? कदाचित आम्ही काय म्हणतोय, हे तुम्हाला समजलं नसेल आणि तुमचा गोंधळ झाला असेल. मात्र, सध्या सोशल मीडियारवर चर्चेचा विषय़ ठरलेली चोरीची ही विनोदी घटना अशीच आहे.
विनवणी करूनही मारत राहिला जमाव; चिमुकलीच्या आकांतानंतरही नाही फुटला पाझर
गेल्या 18 मार्चला इंग्लंडमध्ये इआन स्लॅट्री नावाचा 67 वर्षीय चोर चोरीच्या उद्देशानं ईस्टबोर्नच्या नेशनवाईट बिल्डिंग सोसायटीमध्ये आला. इआन एक निवृत्तव्यक्ती आहे. इआननं तिथे उपस्थित असलेल्या क्लर्ककडे एक चिठ्ठी (Letter) दिली, ही चिठ्ठी इआन आधी स्वतःच लिहित होता. इआननं त्या नोटवर चोरीबाबत काहीतरी लिहिलं होतं. त्याला असं वाटलं असावं, की नोट वाचून क्लर्क घाबरेल आणि लगेचच पैसे आपल्याला देऊ लागेल. मात्र, खरी मजा तेव्हा झाली, जेव्हा इआननं दिलेली चिठ्ठी क्लर्कला समजलीच नाही. इआनचं अक्षर (Hand Writing) इतकं खराब होतं, की त्यानं काय लिहिलंय हेच क्लर्कला समजलं नाही.
क्लर्कनं इआनलाच विचारलं की या नोटवर तू काय लिहिलं आहेस. यानंतर इआन तिथून निघून गेला. इआन तिथून निघून गेल्यानंतर स्टाफनं ती नोट वाचण्याचा प्रयत्न केला. बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न केला गेल्याचं समजताच त्यांनी पोलिसांनी फोन केला. पोलिसांनी सांगितलं, की त्या नोटवर लिहिलं होतं, माझ्याकडे जे आहे त्यानं तुमची स्क्रीन थांबणार नाही. मला 10 आणि 20 डॉलरच्या नोटा द्या. दुसऱ्या ग्राहकांच्याबद्दलही विचार करा. पोलिसांनी ही नोट आणि बँकेतील सीसीटीव्ही फुटेजही आपल्यासोबत घेतलं मात्र चोर त्यांच्या हातून निसटला.
4 वर्षाच्या मुलानं घरासमोर लघवी केल्यानं भडकला शेजारी; मुलाच्या आईची केली हत्या
26 मार्चला स्लॅट्रीनं आपल्या शहरातील दुसऱ्या एका बँकेत चोरीचा प्लॅन केला. यावेळी त्यानं आपली हँडरायटिंग सुधारली होती. त्यानं यावेळी आपल्या हातानं लिहिलेली नोट कॅशियरकडे देत पैसे मागितले. स्लॅट्री तिथून 3300 डॉलर घेऊन जाण्यास यशस्वी ठरला. जेव्हा पोलिसांनी या चोरीबाबत माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी चोराला शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 1 एप्रिलला स्लॅट्रीनं पुन्हा एकदा बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी तो यशस्वी झाला नाही. या घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस तिथे दाखल झाले आणि आरोपीला अटक केली. स्लॅट्रीला एका ठिकाणी चोरी आणि दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Thief, Viral news