मराठी बातम्या /बातम्या /देश /हात जोडून विनवणी करूनही मारत राहिला जमाव; चिमुकलीच्या आकांतानंतरही नाही फुटला पाझर

हात जोडून विनवणी करूनही मारत राहिला जमाव; चिमुकलीच्या आकांतानंतरही नाही फुटला पाझर

रिक्षाचालकाची मुलगी आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी जीवाच्या आकांतानं हात जोडून विनवणी करताना...

रिक्षाचालकाची मुलगी आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी जीवाच्या आकांतानं हात जोडून विनवणी करताना...

धर्मांतर करण्यासाठी एका दलित महिलेवर दबाव (conversion in muslim) आणल्याच्या आरोपातून बजरंग दलाच्या (Bajrang Dal) काही कार्यकर्त्यांनी एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण (Rickshaw driver beaten by mob) केल्याची घटना समोर आली आहे.

कानपूर, 13 ऑगस्ट: धर्मांतर करण्यासाठी एका दलित महिलेवर दबाव (conversion in muslim) आणल्याच्या आरोपातून बजरंग दलाच्या (Bajrang Dal) काही कार्यकर्त्यांनी एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण (Rickshaw driver beaten by mob) केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी संशयित आरोपीला मारहाण करत त्याची मिरवणूक काढली आहे. तसेच या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियात व्हायरल (Viral video) केला आहे. संतप्त जमावाकडून आपल्या वडिलांना होणारी मारहाण पाहून चिमुकलीनं जमावाकडे हात जोडून बापाला न मारण्याची विनवणी केली. पण जमावाच्या हृदयाला पाझर मात्र फुटला नाही. त्यांनी रिक्षा चालकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण सुरूच ठेवली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.

संबंधित घटना उत्तर प्रदेशातील कानपूर येथील बर्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मागील एक महिन्यापासून या प्रकरणांनं परिसरात तणाव निर्माण झाला आहे. संबंधित आरोपी रिक्षाचालक आपल्या शेजारी राहणाऱ्या एका दलित महिलेवर बळजबरीनं धर्मांतर करण्यासाठी दबाव आणत होता. पीडित महिलेनं धर्मांतर करण्यास नकार दिल्यानंतर रिक्षाचालकानं पीडितेला 20 हजार रुपये देण्याचं आमिष दाखवलं. यानंतर पीडित महिलेनं याची तक्रार पोलिसांसोबत स्थानिक आमदाराकडे केली.

हेही वाचा-'अरे चोर नव्हे, मी बाबुराव बोलतोय...'; तरीही तरुणीनी केली धुलाई

या घटनेची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर, काही कार्यकर्त्यांनी संशयित आरोपी रिक्षाचालकाच्या घरी जाऊन त्याला बेदम मारहाण केली आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन रिक्षाचालका शिवीगाळ करत त्याची धिंड काढली आहे. लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याचा व्हिडीओही बनवला आहे. संबंधित रिक्षाचालकाची मुलगी आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी जीवाच्या आकांतानं हात जोडून विनवनी करताना दिसत आहे. पण संतप्त जमाव रिक्षाचालकाला मारत असताना दिसत आहे.

हेही वाचा-उपचारांच्या बहाण्यानं लैंगिक चाळे करणारा भोंदू वैद्य गजाआड

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. बजरंग दलाच्या तावडीतून रिक्षाचालकाची सुटका केली आहे. तसेच मारहाण करण्याऱ्या तीन कार्यकर्त्यांना अटक केली आहे. तसेच अन्य आरोपींचा शोध सुरू केला आहे. आरोपींनी रिक्षाचालकाला जय श्री रामच्या घोषणा देण्यासाठी देखील भाग पाडलं आहे. याप्रकरणी आरोपींना अटक केल्यानंतर शेकडो बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर निदर्शनं केली आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Uttar pradesh