Home /News /crime /

4 वर्षाच्या मुलानं घरासमोर लघवी केल्यानं भडकला शेजारी; सपासप वार करत केली मुलाच्या आईची हत्या

4 वर्षाच्या मुलानं घरासमोर लघवी केल्यानं भडकला शेजारी; सपासप वार करत केली मुलाच्या आईची हत्या

पोलिसांनी (Delhi Police) दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांआधी राणा यांच्या लहान मुलानं आपल्या शेजाऱ्याच्या घरासमोर लघवी केली होती. याच कारणावरुन राणा आणि शेजाऱ्यांच्यात वाद झाला होता

    नवी दिल्ली 13 ऑगस्ट : हत्येची (Murder) एक अत्यंत विचित्र घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेत एका 33 वर्षाच्या महिलेला केवळ यासाठी आपला जीव गमवावा लागला, कारण तिच्या चार वर्षाच्या मुलानं शेजाऱ्याच्या घरासमोर जात लघवी केली होती. ही विचित्र घटना राजधानी दिल्लीमध्ये (Delhi Crime) घडली आहे. दिल्लीच्या अमन विहारमधील सावित्री राणा नावाच्या महिलेवर शेजारीऱ्यानं वार केले. वस्तऱ्यानं महिलेवर वार केले गेले. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे ही हत्या एका अल्पवयीन मुलानं केली आहे. सोशल मीडियावर डेटिंग...मीटिंग..सेक्स आणि धोका; बंटी-बबली पोलिसांच्या जाळ्यात पोलिसांनी (Delhi Police) दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांआधी राणा यांच्या लहान मुलानं आपल्या शेजाऱ्याच्या घरासमोर लघवी केली होती. याच कारणावरुन राणा आणि शेजाऱ्यांच्यात वाद झाला होता. या वादात आरोपी अल्पवयीन मुलाचाही समावेश होता. काही वेळातच जवळच्या दुकानदारांनी आणि शेजाऱ्यांनी ही भांडणं मिटवली. त्यादिवशी लोकांनी केलेल्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला खरा मात्र, कदाचित तो वाद पूर्णपणे संपला नाही. नाशिकच्या फरार शिक्षणाधिकारी डॉ. झनकर यांना दणका; राज्य सरकारकडून मोठी कारवाई पुढे 11 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे साडेअकराच्या दरम्यान अल्पवयीन मुलानं महिलेवर वस्तऱ्यानं हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गंभीर हल्ल्यात महिला जखमी झाली. घटनेत तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास आणि चौकशी करत आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Murder news

    पुढील बातम्या