व्हिडीओत पाहू शकता एक अपंग व्यक्ती व्हिलचेअरसकट रेल्वे ट्रॅकवर पडली. ती ट्रॅकच्या मधोमध अडकली होती. एक व्यक्ती त्याला वाचवण्यासाठी ट्रॅकवर उतरला. काही वेळातच ट्रेन येणार होती. अपंग व्यक्तीला ट्रॅकवरून हटवण्याची धडपड सुरू होते. कसंबसं करून त्याला बाहेर काढलं जातं. हे वाचा - National Highway वरुन खाजगी बस घसरली आणि...; 24 प्रवाशांचा जीव टांगणीला एक महिला ट्रेनकडे लक्ष ठेवून आहे. ट्रेन यायला फक्त 10 सेकंद शिल्लक होते. अपंग व्यक्तीला सर्वात आधी ती व्यक्ती प्लॅटफॉर्मवर चढवते आणि मग स्वतः प्लॅटफॉर्मवर चढते. त्यानंतर दुसऱ्या बाजून धडधड करत ट्रेनही येताना दिसते. सुदैवाने ट्रेन यायच्या आधीच दोघंही प्लॅटफॉर्मवर असतात. पण हा व्हिडीओ पाहतात काळजाचा ठोका मात्र चुकतो.This afternoon in Union Square a man in a wheelchair somehow ended up on the subway tracks. Luckily, a Good Samaritan jumped down and rescued the man about 10s before the train came into the station. Huge shoutout to whoever the guy is who jumped down to help! #subwaycreatures pic.twitter.com/Uhx2drg2NH
— Rick (@SubwayCreatures) August 4, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Railway accident, Railway track, Railway track accident, Shocking viral video, Viral, Viral videos