जाहिरात
मराठी बातम्या / Viral / केस विंचरताना अचानक महिलेच्या डोक्यातून येऊ लागलं रक्त अन्...; हा VIDEO पाहून बसेल धक्का

केस विंचरताना अचानक महिलेच्या डोक्यातून येऊ लागलं रक्त अन्...; हा VIDEO पाहून बसेल धक्का

केस विंचरताना अचानक महिलेच्या डोक्यातून येऊ लागलं रक्त अन्...; हा VIDEO पाहून बसेल धक्का

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या पार्टनरसोबत चेष्टा करतो. मात्र यामुळे महिलेचे पूर्ण केस खराब होतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 07 ऑक्टोबर : सोशल मीडियाच्या (Social Media) दुनियेत प्रँक व्हिडिओ (Prank Video) नेटकऱ्यांच्या चांगलेच पसंतीस उतरतात. यामुळे प्रँक व्हिडिओ बनवण्याचं प्रमाण आजकाल बरंच वाढलं आहे. यातील काही व्हिडिओ इतके खास असतात की अनेकजण हे आपल्या अकाऊंटवरुन शेअरही करतात. काही व्हिडिओ असे असतात जे सर्वांनाच हैराण करतात. तर, काही व्हिडिओ अगदी खळखळून हसवतात. सध्या असाच एक प्रँक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Prank Video) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. VIDEO: स्टेजवर चढायलाच तयार नव्हती नवरी; नवरदेवानं केलं असं काही की सगळेच हैराण व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या पार्टनरसोबत चेष्टा करतो. मात्र यामुळे महिलेचे पूर्ण केस खराब होतात. यानंतर ही महिला आपल्या पतीवर रागवते आणि त्याच्यावर ओरडायला सुरुवात करते. हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. अनेकांना पतीची ही चेष्टा फार आवडलेली नाही.

जाहिरात

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती आपल्या पत्नीसोबत प्रँक करण्यासाठी तिचा हेअर ब्रश (Hair Brush) उघडून त्यात भरपूर कॅचअप भरतो. यानंतर तो पुन्हा हा ब्रश पहिल्यासारखाच जोडून ठेवतो. महिला अंघोळ करून बाहेर येते आणि आपले केस ब्रश करू लागते. इतक्यात ब्रशमधील कॅचअप जमिनीवर पडू लागतो. सुरुवातीला तिला हे नक्की काय आहे हेच समजत नाही. आपल्या डोक्यातून रक्त येत असल्याचं तिला वाटतं. मात्र, काहीच वेळात तिला हा प्रँक असल्याचं समजतं आणि रागावून ती आपल्या पार्टनवर चिडते अन् मोठमोठ्यानं ओरडू लागते. हृदयद्रावक! 14 वर्षापूर्वी ज्याने वाचवलं त्याच्याच कुशीत गोरिलाने सोडले प्राण हा विनोदी व्हिडिओ इन्स्टाग्रामवर nicocapone.comedy नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 26 लाखाहून अधिकांनी लाईक केला आहे. काहींनी महिलेसाठी दुःख व्यक्त केलं आहे तर काही हा व्हिडिओ पाहून पोट धरून हसत आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, हे अजिबातही विनोदी नाही. यामुळे महिलेचे केसही खराब होऊ शकत होते. इतरही अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात