नवी दिल्ली 07 ऑक्टोबर : सोशल मीडियावर नदाकासी गोरिला आणि या गोरिलाला 2007 साली रेस्क्यू केलेल्या आंद्रे बाउमाचा एक जुना फोटो पुन्हा एकदा चांगलाच व्हायरल (Viral Photo of Gorila and Ranger) होत आहे. मिलिशियाने बुशमीटची शिकार करत असताना या गोरिलाच्या कुटुंबाचा शेवट झाला, यानंतर आंद्रे यांना हा मादी गोरिला आपल्या आईच्या निर्जीव शरीराजवळ बसला असल्याचं आढळलं. अवघ्या दोन महिन्यांच्या वयातच नदाकासी गोरिलाला विरुंगा नॅशनल पार्कमधील सेन्कवेक्वे सेंटरमध्ये आणण्यात आलं होतं. सध्या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये दिसतं, की बाउमा जमिनीवर एक कापड पसरवून त्यावर बसले आहेत तर मादा गोरिला त्यांच्या छातीवर डोकं ठेवून बसला आहे. 36 लाख रुपयांमध्ये विकली जातेय ही झोपडी, Toilet साठी जावं लागेल शेतात! हा फोटो पुन्हा एकदा व्हायरल होत आहे कारण नदाकासीनं वयाच्या 14 व्या वर्षी 26 सप्टेंबरला अखेरचा श्वास घेतला (Gorilla Dies in The Arms of Ranger) आहे. दीर्घ काळापासून ही मादा गोरिला आजारी होती. पार्कनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. या पोस्टसोबतच पार्कनं गोरिला आणि आंद्रे यांचा तो व्हायरल फोटोही शेअर केला आहे.
Sharing again, selfie of the century, a ranger and friends at Virunga National Park in DR Congo. On #WorldRangerDay pic.twitter.com/Kp3BCkCHCS
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) July 31, 2020
पार्कनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, की गेल्या अनेक वर्षांपासून पार्क देखभाल करत असलेल्या आमच्या प्रिय गोरिलाचं निधन झालं आहे. 26 सप्टेंबरला दुपारी या गोरिलानं आपल्या आवडत्या आंद्रे बाउमा या केअरटेकरच्या कुशीत आपले प्राण सोडले. बाउमा यांनीच या गोरिला 14 वर्षापूर्वी रेस्क्यू केलं होतं. VIDEO : कधी पाहिलं नसेल असं दृश्य; आईसाठी चार भावांमध्ये सुरूये वाद, शेवटी… या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत दुःख व्यक्त केलं आहे. या पोस्टवर आतापर्यंत 31,000 अनेकांनी रिअॅक्शन दिल्या आहेत तर अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. ज्या वेळी 2019 मध्ये Ndakasi चा रेंजरांसोबतचा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यावेळी पार्कने त्यांच्या वेबसाईटवर स्पष्ट केलं होतं, की युद्ध आणि सशस्त्र संघर्षाने या गोरिलावर गंभीर परिणाम झाला आहे.

)







