• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • धक्कादायक! दारू पिऊन महिलेचं पोटच्या मुलीसोबत अमानुष कृत्य; गाडीसोबत फरफटत नेलं अन्...

धक्कादायक! दारू पिऊन महिलेचं पोटच्या मुलीसोबत अमानुष कृत्य; गाडीसोबत फरफटत नेलं अन्...

या मुलीनं आपल्या दारूच्या नशेत असलेल्या आईला कार चालवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, महिलेला या गोष्टीचा इतका राग आला की तिनं मुलीसोबत हे अमानुष कृत्य केलं

 • Share this:
  नवी दिल्ली 21 सप्टेंबर : अमेरिकेच्या (America) कॅलिफोर्नियातून (California) एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. यात एका निर्दयी आईनं (Unkind Mother) आपल्या 8 वर्षाच्या मुलीला कारसोबतच फरफटत नेलं (Drunk Woman Dragged Daughter With Car) . यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या मुलीनं आपल्या दारूच्या नशेत असलेल्या आईला कार चालवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, महिलेला या गोष्टीचा इतका राग आला की तिनं मुलीसोबत हे अमानुष कृत्य केलं. ही महिला एवढ्यावरच थांबली नाही. तर यानंतर तिनं पोलिसांसोबतही जे केलं ते धक्कादायक (Shocking News) होतं. अरे बापरे! केस पेटत होते तरी ती काम करत राहिली आणि...; पाहा धक्कादायक VIDEO डेली मेलच्या वृत्तानुसार, 44 वर्षीय एरिन ग्रेशिया दारूच्या नशेत गाडी चालवण्यासाठी बसली तेव्हा तिच्या 8 वर्षाच्या मुलीनं तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. तिनं कारच्या पॅसेन्जर डोरचं हॅण्डल पकडून आपल्या आईला विनंती केली की दारूच्या नशेत गाडी चालवू नको. मात्र, नशेत एरिनला काहीच कळत नव्हतं. तिनं रागात गाडी सुरू केली आणि रेस वाढवली. मुलीचा हात हॅण्डलमध्येच अडकून राहिला आणि ती काही अंतर गाडीसोबतच फरफटत गेली. 300 मीटर अंतर पुढे जाताच एका व्यक्तीनं हे पाहिलं, त्यानं महिलेला रोखलं आणि तिची चूक तिला दाखवून दिली. मात्र, महिलेनं पुन्हा गाडीची रेस वाढवली आणि या व्यक्तीलाही गाडीसोबत फरफटत नेलं. यानंतर एरिन तिथून फरार झाली. जेव्हा पोलिसांनी या घटनेची माहिती मिळाली तेव्हा ते एरिनच्या आईच्या घरी पोहोचले. तिथे पोलिसांनी महिलेच्या मुलीला पाहिलं. तिला भरपूर दुखापत झाली होती. पोलिसांनी मुलीला रुग्णालयात दाखल करत तिच्या आईचा शोध घेण्यास सुरुवात केली. महिला घरामागे असलेल्या झुडपांमध्ये लपलेली होती. कावळ्यांनाच का मानलं जातं पितरांचं प्रतीक? पितृपक्षात का दिलं जातं त्यांना अन्न? जेव्हा एक पोलीस कर्मचारी तिला अटक करण्यासाठी जवळ गेला तेव्हा तिनं त्याला लाथ मारली. बऱ्याच प्रयत्नांनंतर महिलेला अटक करण्यात आली आणि तिला ऑरेंज काऊंटी जेलमध्ये पाठवलं गेलं. तिच्यावर हल्ला करणे, मुलीसोबत गैरवर्तन करणे आणि पोलिसाला मारहाण केल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर या महिलेचे फोटो आणि व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत. यात पोलीस तिला अटक करून घेत जात असल्याचं दिसत आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: