नवी दिल्ली 10 जुलै : सोशल मीडियावर (Social Media) कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. काही व्हिडिओ (Viral Video) तर असे असतात जे पाहता पाहता प्रसिद्धीझोतात येतात. काही व्हिडिओ पाहून यूजर्सही हैराण होतात आणि यावर विश्वास ठेवणं कठीण वाटतं. असं खरंच होऊ शकतं का? असा प्रश्न अनेकदा पडतो. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला असून यातील लहान मुलाचा डान्स (Dance Video) पाहून सगळेच थक्क झाले आहेत. हा व्हिडिओ लोकांच्या पसंतीस उतरत आहे.
अनेकदा लहान मुलांचा निरागसपणा लोकांचं मन जिंकतो. तर, अनेकदा त्यांच्या करामतीही मन जिंकून जातात. सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एका चिमुकल्यानं असा डान्स केला आहे, जो लोकांच्या भलताच पसंतीस उतरत आहे. व्हिडिओमध्ये मुलांचा जबरदस्त डान्स पाहायला मिळत आहे. मात्र, एका मुलाच्या डान्सनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
स्वयंपाकाच्या बहाण्यानं घरी बोलवून तरुणीवर सामूहिक बलात्कार; VIDEOही केला शूट
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका रस्त्यावर काही मुलं उभा आहेत आणि त्यांनी शाळेचा गणवेश घातला आहे. या मुलांनी निळ्या रंगाचा शर्ट आणि नेव्ही ब्लू कलरची हाफ पॅन्ट घातली आहे. या सगळ्यांमध्ये एक साध्या कपड्यांमधील मुलगाही आहे. हा मुलगा सर्वांच्या पुढे उभा राहून जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. यादरम्यान इतर मुलं त्याला प्रोत्साहन करताना दिसत आहेत. मात्र, हा मुलगा आपल्याच दुनियेत मग्न असून एखाद्या डान्स एक्सपर्टप्रमाणेच डान्स करत आहे.
Twitter right now pic.twitter.com/NiANFCk538
— Umashankar Singh उमाशंकर सिंह (@umashankarsingh) July 8, 2021
Video: ...अन् लग्नातच दिरांनी वहिनीला घेरलं; नवरीचं असं स्वागत कधीच पाहिलं नसेल
हा व्हिडिओ @umashankarsingh नावाच्या एका यूजरनं शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 51 हजारहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यासोबतच व्हिडिओला 6 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर, अनेकांनी हा व्हिडिओ रिट्विटही केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dance video, Video viral