मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Dhule Crime: स्वयंपाकाच्या बहाण्यानं घरी बोलवून तरुणीवर सामूहिक बलात्कार; अत्याचाराचा VIDEO केला शूट

Dhule Crime: स्वयंपाकाच्या बहाण्यानं घरी बोलवून तरुणीवर सामूहिक बलात्कार; अत्याचाराचा VIDEO केला शूट

पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली असता, तिच्या चुलत भावानं बळजबरी करत तिच्यावर बलात्कार केला आहे.

पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली असता, तिच्या चुलत भावानं बळजबरी करत तिच्यावर बलात्कार केला आहे.

Gang Rape in Dhule: धुळे जिल्ह्यातील लामकानी याठिकाणी दोन मित्रांनी (2 Friends) एका तरुणीवर सामूहिक बलात्कार (Gang rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

धुळे, 10 जुलै: धुळे जिल्ह्यातील लामकानी याठिकाणी दोन मित्रांनी (2 Friends) एका तरुणीवर सामूहिक बलात्कार (Gang rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं पीडित तरुणीला घरी स्वयंपाक (Called woman for cooking) करण्यासाठी बोलवलं आणि आपल्या मित्राच्या मदतीनं तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी अत्याचाराचा व्हिडीओदेखील शूट केला आहे.  ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. अनिल भिल आणि काळू भिल असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहे. घटनेच्या दिवशी आरोपी अनिल भिल याची पत्नी गावाला गेली होती. दरम्यान अनिलनं आपला मित्र काळू भिल याला आपल्या घरी बोलवलं. दरम्यान आरोपीनं स्वयंपाक करण्याचा बहाणा करत शेजारी राहणाऱ्या एका 28 वर्षीय युवतीला घरी बोलवलं. मदत करण्याच्या भावनेतून पीडित तरुणीही स्वयंपाक करण्यासाठी आरोपीच्या घरी आली.

हेही वाचा-डॉक्टरनं 16 वर्षीय मुलीसोबत केले अश्लील चाळे अन्...; नागपूरातील संतापजनक घटना

पीडितेनं घरात येऊन दरवाजा बंद करताच, आरोपी अनिलनं पीडितेला धमकावून तिच्यासोबत जबरदस्ती करायला सुरुवात केली. यावेळी आरोपी अनिल भिलचा मित्र काळू भिल देखील घरातचं लपून बसला होता. पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी अनिल भिल यानं पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीनं तिच्यावर बलात्कार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्यानं अत्याचाराचा व्हिडीओ देखील शूट केला. यानंतर आरोपीचा मित्र काळू यानंही पीडितेवर बलात्कार केला.

हेही वाचा-रात्री 11.30 वा. अपहरण, 3 वेगवेगळ्या गावी 7 जणांनी मुलीवर केला गँगरेप

बलात्कार केल्यानंतर दोन्ही आरोपींनी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीची सुटका केली. यानंतर पीडितेनं पोलीस स्टेशन गाठत दोघांविरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी दोन्ही आरोपी विरोधात बलात्कारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Dhule, Gang Rape