नवी दिल्ली 07 सप्टेंबर : चोर (Thief) केवळ योग्य संधीच्या शोधात असतात आणि ही संधी मिळताच ते हात साफ करून घेतात. अनेकदा हे चोर दिवसाढवळ्या किंवा अगदी गर्दीच्या ठिकाणी जात चोरी करतात. तर, काहीवेळा चोरी करण्यासाठी ते असं काही करतात की ते पाहूनच आपल्याला हसू येतं. सध्या अशाच एका चोराचा किस्सा समोर आला आहे. ही घटना जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार (Funny Incident of Theft) नाही.
बहुतेकदा चोर एखाद्या ठिकाणी जेव्हा डल्ला मारतात तेव्हा एकदा चोरी करून तिथून पळून जाणं हाच पर्याय निवडतात. मात्र, सध्या जो व्हिडिओ (Video of Theft) समोर आला आहे, त्यात चोर एकाच मिनिटात दोन वेळा चोरी करताना दिसतो. हे पाहून लोकांनी त्याला आपलं प्रोफेशन बदलण्याचा सल्ला दिला आहे.
स्टंट मारताना चवताळला बैल, शिंगावर धरून हवेतच उडवलं; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की हा चोर रात्रीच्या वेळी एका दुकानात चोरी करण्यासाठी शिरला आहे. आधी तो दुकानातील गल्ल्यातून काही पैसे घेतो आणि तिथून निघून जातो. यानंतर काहीच सेकंदात तो पुन्हा तिथे येतो आणि पुन्हा एकदा गल्ल्यातील पैसे काढतो. चोराचं हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झालं आहे. याचाच व्हिडिओ आता व्हायरल (Viral Video) होत आहे.
सोशल मीडियावर या व्हिडिओला अनेकांची पसंती मिळत आहे. याच कारणामुळे अनेकांनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरनं म्हटलं, की हा व्हिडिओ खरंच मजेशीर आहे. तर, दुसऱ्या एका यूजरनं म्हटलं, की वेळ लोकांना काय काय करायला लावते. आणखी एकानं लिहिलं, की तुझी मजबुरी दुकानदाराला महागात पडेल. याशिवाय इतरही अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.