मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Shocking! साखरपुड्यानंतर होणाऱ्या नवऱ्यासोबत पहिल्यांदाच ठेवले शारीरिक संबंध; अवघ्या काही तासात तरुणीचा मृत्यू

Shocking! साखरपुड्यानंतर होणाऱ्या नवऱ्यासोबत पहिल्यांदाच ठेवले शारीरिक संबंध; अवघ्या काही तासात तरुणीचा मृत्यू

दोघांनी सायंकाळी 5 वाजता शारीरिक संबंध ठेवले होते, त्यानंतर रात्री 2 वाजता तिला मृत घोषित करण्यात आलं

दोघांनी सायंकाळी 5 वाजता शारीरिक संबंध ठेवले होते, त्यानंतर रात्री 2 वाजता तिला मृत घोषित करण्यात आलं

दोघांनी सायंकाळी 5 वाजता शारीरिक संबंध ठेवले होते, त्यानंतर रात्री 2 वाजता तिला मृत घोषित करण्यात आलं

  • Published by:  Meenal Gangurde

मध्य प्रदेश, 6 सप्टेंबर : भोपाळमधील (Bhopal News) एका तरुणीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून तरुणीच्या होणाऱ्या पतीची चौकशी सुरू आहे. या दोघांचा साखरपुडा झाला होता आणि तिने पहिल्यांदाच आपल्या होणाऱ्या पतीसोबत लैंगिक संबंध ठेवले. शारीरिक संबंध ठेवल्यानंतर तरुणीला रक्तस्त्राव सुरू झाला. यानंतर तरुणीला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. यावेळी तरुणीने डॉक्टरांना सांगितलं की, रक्तस्त्राव थांबत नाहीये. उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला. (Shocking First time sexual intercourse with a Husband to be The young woman died in just a few hours )

तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. लवकरच दोघांचं लग्न होणार होतं. मात्र त्यापूर्वीच तरुणाने हॉटेलमध्ये एक खोली बुक करून तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले.  मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साधारण 2 वाजता एका खासगी रुग्णालयातून फोन आला होता. त्यांनी सांगितलं की, 28 वर्षीय एका तरुणीचा मृत्यू झाला आहे.

तिच्या शरीरातून खूप रक्त वाहिलं आहे. तरुणीने मृत्यूपूर्वी सांगितलं होतं की, ती मंडीदीप येथे राहणारी होती. तिचा साखरपुडाही झाला आहे. तो होणाऱ्या नवऱ्याला भेटण्यासाठी भोपाळ येथे आली होती. दोघांनी सायंकाळी साधारण 5 वाजता शारीरिक संबंध ठेवले. यादरम्यान तिला रक्तस्त्राव सुरू झाला. तरुणाला सुरुवातीला तिला जवळील एका रुग्णालयात नेलं. यानंतर तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं की, खूप प्रयत्न करूनही रक्तस्त्राव थांबत नव्हता. याकारणामुळे तिचा मृत्यू झाला. तरी तरुणीचं पोस्टमार्टम करण्यासाठी पाठविण्यात आलं आहे.

हे ही वाचा-भयावह! आईने मुलीच्या Love Storyचा असा केला End; 25 वर्षे सुरू होता जीवघेणा खेळ

रविवारी दोघेही एकत्र होेते. त्याशिवाय दोघांचा साखरपुडाही झाला आहे. तरुणीने डॉक्टरांना दिलेल्या जबाबात काहीच संशयास्पद असल्याचं सांगितलं नाही. तरी या प्रकरणाचा तपास सुरू आहे. कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर या प्रकरणात पुढील कारवाई करण्यात येईल.

First published: