• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • स्टंट मारायला गेला आणि चवताळला बैल; शिंगावरून उडवून जमिनीवर आपटलं; काळजाचा ठोका चुकवणारा Video

स्टंट मारायला गेला आणि चवताळला बैल; शिंगावरून उडवून जमिनीवर आपटलं; काळजाचा ठोका चुकवणारा Video

बैलाशी पंगा घेणं तरुणाला चांगलंच महागात पडलं.

 • Share this:
  मुंबई, 06 सप्टेंबर : एरवी शांत असणारे पाळीव प्राणी (Animal video) चवताळले तर काय करतील याचा नेम नाही. अगदी जंगली प्राण्यांप्रमाणेच ते आपलं रूप धारण करतात आणि मग त्याच्या भयंकर परिणामांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे अशा चवताळलेल्या प्राण्यांपासून दोन हात दूर राहिलेलं बरंच (Angry bull video). पण काही जण त्यांच्या जवळ जाण्याची डेअरिंग करतात आणि त्यांना ते चांगलंच महागात पडतं. एका बैलाशी पंगा घेणं एका तरुणाला असंच महागात पडलं आहे. या बैलाने पाठीवर बसलेल्या तरुणाला आपल्या शिंगांनी हवेत उडवलं आणि जमिनीवर आपटलं (Angry bull threw man in the air). हा भयंकर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Shocking video). चवताळलेल्या बैलाच्या पाठीवर बसण्याची ही स्पर्धा व्हिडीओत पाहू शकता, तरुण एका बैलावर बसतो. त्यानंतर तो गेट खोलतो आणि मैदान जाताच बैल चवताळतो. तो पाठीवर बसलेल्या तरुणाला पाडण्याचा प्रयत्न करतो. हे वाचा - सफाई कर्मचारी बनला 'सुपरहिरो', चिमुकल्याला मृत्यूच्या दाढेतून खेचलं; थरारक VIDEO आता ही स्पर्धा असल्याने बैलाने कितीही जोर लावला तरी त्याच्या पाठीवर पडायचा नाही, यासाठी तरुण पुरेपूर प्रयत्न करताना दिसतो आहे. बैल इकडे तिकडे नाचतो, आपली मान हलवतो पण तरुणही आपला तोल सांभाळताना दिसतो. पण बैलही आपली पूर्ण ताकद लावतो. तरुण जेव्हा बैलाच्या पाठीवरून शिंगाच्या दिशेने येतो तेव्हा बैल आपल्या मानेला जोरात झटका देतो आणि तरुणाला शिंगावर धरून हवेतच उडवतो. त्यानंतर तो तरुण प्रेक्षकांवर जाऊन पडतो आणि धाडकन जमिनीवर आपटतो. हे वाचा - ...अन् 20 फूट अजगरानं तीन वेळा केला हल्ला; हादरवून टाकणारा Video आला समोर हा व्हिडीओ पाहून आपल्याला धडकीच भरते. तशाच कमेंटही हा व्हिडीओ पाहून येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published: