नवी दिल्ली 03 जानेवारी : दारू पिणं आरोग्यासाठी किती नुकसानकारक असतं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र तरीही लोक दारू पिणं बंद करत नाहीत. आजकाल तर तरुणांमध्येही दारू पिण्याची (Drinking Alcohol) जणू स्पर्धाच आहे. सुरुवातीला हे लोक हौस म्हणून दारू पितात मात्र नंतर हीच सवय बनून जाते. पुढे ही सवय सोडणं अशक्य होत जातं. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की दारूमुळे संपूर्ण घर उद्धवस्त झालं. हे आम्ही माणसांबद्दल बोलत आहोत, मात्र तुम्ही कधी माकडाला दारू पिताना पाहिलं आहे का? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Funny Video of Monkey) होत आहे. यात एक माकड दारू पिताना दिसतं (Monkey Drinking Alcohol) आणि नंतर ते पूर्णपणे नशेत जातं. पिल्लाला वाचवण्यासाठी सिंहासोबत भिडलं जिराफ; शेवट पाहून पाणावतील डोळे, VIDEO तुम्ही अनेकदा माणसं नशेत असल्याचं पाहिलं असेल. अनेक असे लोक आहेत ज्यांना दारू पिल्यानंतर काहीच समजत नाही आणि ते विचित्र कृत्य करू लागतात. विचित्र पद्धतीने चालणं हा दारू पिण्याचा सर्वात मोठा साईड इफेक्ट आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये हे माकड असं काही चालत नाही मात्र ते अजब कृत्य करताना दिसतं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की माकड एका मोठ्या बाटलीत दारूप्रमाणे दिसणारंच द्रव्य पित आहे. हे पिल्यानंतर असं वाटत जणू हळूहळू त्याला नशा चढत आहे. ते इकडे-तिकडे पाहू लागतं आणि मग आपल्या हातावर चालू लागतं.
काही सोशल मीडिया यूजर्सचं असं म्हणणं आहे की या व्हिडिओमध्ये दोन क्लिप मर्ज केल्या गेल्या आहेत. मात्र हा व्हिडिओ अतिशय मजेशीर आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुसांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओ आतापर्यंत 58 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. तर 3 हजारहून अधिकांनी व्हिडिओ लाईक केला आहे. शिक्षकांचा अनोखा निरोप समारंभ, हत्तीवरून काढली वरात; जमली हजारोंची गर्दी अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, ‘दम मारो दम मोमेंट…मुझको यारों माफ करना मैं नशे में हूं’. तर दुसऱ्या यूजरने लिहिलं, हा फ्री-डिलिव्हरी योजनेचा परिणाम आहे. आणखी एकाने कमेंट करत लिहिलं, ‘जंगल में मंगल’. याशिवायही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.

)







