Home /News /national /

शिक्षकांचा अनोखा निरोप समारंभ, हत्तीवरून काढली वरात; जमली हजारोंची गर्दी

शिक्षकांचा अनोखा निरोप समारंभ, हत्तीवरून काढली वरात; जमली हजारोंची गर्दी

गावात दोन दशकं सेवा दिलेल्या शिक्षकांना त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त गावकऱ्यांनी असा निरोप दिला, की गुरुजींचेही डोळे पाणावले.

    जयपूर, 2 जानेवारी: एका शिक्षकांचा (Teacher) अनोखा उपक्रम समारंभ (Farewell) सर्वत्र गाजला. गुरु शिष्य (Teacher student culture) परंपरेचा अनोखा नजारा या निरोप समारंभात पाहायला मिळाला. गावात शिक्षक इतके लोकप्रिय होते की त्यांच्या निवृत्तीनंतर (Retirement) गावानं त्यांची जाहीर मिरवणूक काढली (Public procession on elephant) आणि त्यांना अनोख्या पद्धतीनं अलविदा केला. 20 वर्षांची सेवा राजस्थानमधील भिलवाड्यात भंवरलाल शर्मा नावाच्या शिक्षकांनी अविरत 20 वर्ष सेवा केली. एक विद्यार्थीप्रिय आणि कडक शिक्षक म्हणून ते लोकप्रिय होते.गावातील अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखाली घडले आणि भविष्यात यशस्वी ठरले. अशा हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपल्या या गुरुवर्यांचा अनोखा निरोप समारंभ करण्याची योजना आखली आणि त्याला मूर्त स्वरूप दिलं. हत्तीवरून काढली मिरवणूक 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या शर्मा सरांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला हत्तीवरून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. गावातील सर्व गल्ल्यांमधून ही मिरवणूक फिरली आणि प्रत्येकाने सरांवर पुष्पवृष्टी करत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. काव्य संमेलन गुरुजी हे साहित्याचे भोक्ते असल्यामुळे निरोप समारंभादिवशी रात्री काव्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. गावातील आणि परिसरातील मान्यवर कवींना यासाठी निमंत्रित करण्यात आलं आणि कवितांची रंगतदार मैफत सजली होती. हे वाचा- Karan Johar च्या विचित्र फॅशन सेन्सवर चाहते भडकले; म्हणाले, 'ये हाथ मुझे...' शिक्षकांनी दिले 2 लाख रुपये गावकऱ्यांनी आपला असा जंगी गौरव केल्यामुळे शर्मा सर चांगलेच भारावून गेले होते. त्यांनी आपल्या भाषणात एक मोठी घोषणा केली. गावातील मुलांच्या संगणक प्रशिक्षणासाठी आपण 2 लाख रुपये देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि सर्वांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. गुरुजींचा हा निरोप समारंभ केवळ गावातच नव्हे, तर अख्ख्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Elephant, Rajsthan, Teacher

    पुढील बातम्या