जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पिल्लाला वाचवण्यासाठी सिंहासोबत भिडलं जिराफ; लढाईचा शेवट पाहून पाणावतील डोळे, VIDEO

पिल्लाला वाचवण्यासाठी सिंहासोबत भिडलं जिराफ; लढाईचा शेवट पाहून पाणावतील डोळे, VIDEO

पिल्लाला वाचवण्यासाठी सिंहासोबत भिडलं जिराफ; लढाईचा शेवट पाहून पाणावतील डोळे, VIDEO

सिंहिणीपुढे या पिल्लाचं नेमकं काय झालं असेल? कदाचित तुम्हालाही असं वाटेल की पिल्लाचा शेवट झाला असेल. मात्र, लाख प्रयत्न करूनही सिंहिण या पिल्लाची शिकार करू शकली नाही

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 03 जानेवारी : जंगल सवारीची मजा घेणं प्रत्येकालाच आवडतं. मात्र यावेळी जंगली प्राण्यांचं भयानक रूप आणि लढाई सर्वांनाच पाहायला मिळेल, असं नाही. सध्या जंगलातील एक अतिशय खास व्हिडिओ समोर आला आहे (Lioness Attack Baby Giraffe Video). यात एक मादी जिराफ आपल्या पिल्लासोबत (Baby Giraffe video) चालताना दिसत आहे. कदाचित ती आपल्या पिल्लाला आपल्या संरक्षणात जंगलाची ओळख करून देत असावी. आई आणि पिल्लू आरामात फिरत असतानाच एका बाजूने हायनांचा कळप तर दुसऱ्या बाजूने एक सिंहिण येते. या सर्वांची नजर जिराफाच्या पिल्लावरच असते. मात्र काहीच वेळात हायनांच्या कळपाचा निर्णय बदलला. 3 वर्षात 107 घरांमध्ये लागली रहस्यमयी पद्धतीने आग; कारण समोर येताच पोलीसही शॉक सिंहिण मात्र पिल्लाच्या शिकारीच्याच बेतात होती. हे पिल्लू अजून व्यवस्थित धावायलाही शिकलेलं नव्हतं. अशात त्याला सिंहिणीची शिकार बनण्यापासून वाचवणं त्याच्या आईची जबाबदारी होती. बराच वेळ जिराफ आपल्या पिल्लासोबत सावली बनून उभा राहिलं. मात्र पुढच्याच क्षणी सिंहिणीने या पिल्लावर हल्ला केला (Lioness Attack Baby Giraffe Video) . सिंहिणीने या पिल्लाला आपल्या जबड्याच पकडलं आणि लांबपर्यंत ओढत घेऊन गेली.

सिंहिणीपुढे या पिल्लाचं नेमकं काय झालं असेल? कदाचित तुम्हालाही असं वाटेल की पिल्लाचा शेवट झाला असेल. मात्र, लाख प्रयत्न करूनही सिंहिण या पिल्लाची शिकार करू शकली नाही आणि एखाद्या चमत्काराप्रमाणे बेबी जिराफ उठून उभा राहिलं आणि तिथून दूर गेलं. मात्र भरपूर जखमी झाल्याने आणि अशक्त असल्याने हे पिल्लू नदीत जाऊन कोसळलं. बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतानाच ते नदीच्या पाण्यात वाहून गेलं. जिराफाच्या पिल्लाचा ज्या पद्धतीने अंत झाला, ते पाहून तुम्हीही भावुक व्हाल.

दरीच्या कडेला उभा राहून मित्राला देत होता झोका; पाय घसरला अन्…, Shocking Video

आयुष्यासाठीच्या संघर्षाचा हा व्हिडिओ वाईल्डलाईफवर काम करणाऱ्या कुगर कंपनीच्या www.latestsightings.com चॅनेलचा आहे. हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला, वाईल्डलाईफ फोटोग्राफर **(Wildlife photographer)**आणि Escape Safari चे मालक डॉन हेनके आणि सफारी कन्सलटंट रुस्तम फ्रेमजी (Rustom Framjee) यांनी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात