मराठी बातम्या /बातम्या /Viral /नवरीला हरवण्यासाठी नवरदेवानं केले आटोकाट प्रयत्न; तरीही मानावी लागली हार, पाहा Wedding Video

नवरीला हरवण्यासाठी नवरदेवानं केले आटोकाट प्रयत्न; तरीही मानावी लागली हार, पाहा Wedding Video

नवरदेव आणि नवरीचा हा मजेशीर व्हिडिओ वरमाळेच्या कार्यक्रमावेळीचा आहे. यात दिसतं की नवरदेव मस्ती करण्याच्या मूडमध्ये आहे

नवरदेव आणि नवरीचा हा मजेशीर व्हिडिओ वरमाळेच्या कार्यक्रमावेळीचा आहे. यात दिसतं की नवरदेव मस्ती करण्याच्या मूडमध्ये आहे

नवरदेव आणि नवरीचा हा मजेशीर व्हिडिओ वरमाळेच्या कार्यक्रमावेळीचा आहे. यात दिसतं की नवरदेव मस्ती करण्याच्या मूडमध्ये आहे

नवी दिल्ली 01 नोव्हेंबर : नवरदेव आणि नवरी अगदी आतुरतेने लग्नाच्या दिवसाची (Wedding Day) वाट पाहत असतात. यासाठी ते भरपूर प्लॅनिंग आणि तयारी करतात. लग्नातील प्रत्येक कार्यक्रम (Wedding Ritual) खास व्हावा यासाठी मोठी तयारी केली जाते. सध्या अशाच एका लग्नातील नवरी आणि नवरदेवाचा एक व्हिडिओ (Viral Video of Bride and Groom) सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. यात नवरदेवानं वरमाळेच्या कार्यक्रमावेळी नवरीबाईला हरवण्यासाठी पूर्ण ताकत लावल्याचं दिसतं. मात्र, तरीही तो नवरीसमोर टिकू शकला नाही. यादरम्यान नवरीनंच विजय मिळवला.

जबरदस्त! वयाच्या 16 वर्षी सुरू केलं Saving; 21 येईपर्यंत खरेदी केलं स्वत:च घर

नवरदेव आणि नवरीचा हा मजेशीर व्हिडिओ वरमाळेच्या कार्यक्रमावेळीचा आहे. यात दिसतं की नवरदेव मस्ती करण्याच्या मूडमध्ये आहे. वरमाळेच्या कार्यक्रमावेळी नवरी आणि नवरदेव दोघांतेही नातेवाईक त्यांना उचलून घेतात. यादरम्यान दोघंही जवळपास एकाच उंचीवर असतात. मात्र, नवरीसोबत मस्ती करण्यासाठी नवरदेव आपल्या उंचीचा फायदा घेतो आणि नवरीपासून आणखी दूर जातो. अशात नवरदेवाला वरमाळा घालण्यासाठी नवरीला भरपूर मेहनत घ्यावी लागते. मात्र ती हार मानत नाही आणि नवरदेवाने अनेक प्रयत्न करूनही ती त्याच्या गळ्यात वरमाळा टाकतेच. यानंतर नवरदेवही तिच्यासमोर आपली मान झुकवतो.

नवरी आणि नवरदेवाची ही मस्ती पाहुण्यांनीही एन्जॉय केली. नवरीबाई वरमाळा घालण्यासाठी करत असलेला प्रयत्न पाहून नवरदेवालाही हसू आवरत नव्हतं. तर पाहुणेही नवरीबाईला चिअर करत होते. अखेर नवरीबाईनं वरमाळा नवरदेवाच्या गळ्यात टाकताच सगळे हसू लागले. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @official_viralclips नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे.

VIDEO - नवरी जोमात नवरा कोमात! नवरीबाईचं ते रूप पाहून नवरदेवाला बसला जोर का झटका

या व्हिडिओमधील नवरी नवरदेवाची मस्ती अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. तर, काहींनी वरमाळेसारख्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात अशी मस्करी केल्यानं नाराजी व्यक्त केली आहे.

First published:

Tags: Bridegroom, Wedding video