• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO - नवरी जोमात नवरा कोमात! नवरीबाईचं 'ते' रूप पाहून नवरदेवाला बसला जोर का झटका

VIDEO - नवरी जोमात नवरा कोमात! नवरीबाईचं 'ते' रूप पाहून नवरदेवाला बसला जोर का झटका

शेजारी बसलेली नवरी असं काही करू लागली की नवरदेव आ वासून पाहत राहिला.

 • Share this:
  मुंबई, 31 ऑक्टोबर : पुरुष असो वा महिला लग्न (Wedding video) म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच (Bride groom video) नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा (Bride groom wedding surprise video) आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. अशाच एक नवरीने आपल्या नवरदेवाला असं सरप्राइझ (Bride surprise video) दिलं जे पाहून तो थक्कच झाला (Wedding dance video). नवरा-नवरी एकमेकांच्या शेजारी बसले होते. त्यावेळी नवरी अचानक असं काहीतरी करू लागते की सर्वांचं लक्ष तिच्याकडे जातं. नवरदेव तिच्याकडे पाहतो तर तोसुद्धा शॉक होतो. नवरीला पाहून तो तोंडावर हातच ठेवतो. डोळे मोठे करून, आ वासून तिच्याकडे पाहत राहतो. नवरदेवासह सर्व पाहुणे, नातेवाईकही नवरीला पाहून थक्क होतात. आता ही नवरी नेमकं असं करते तरी काय?
  दुल्हनिया इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता नवऱ्याच्या शेजारी शांत बसलेली नवरी अचानक हलू लागते. गाणं लागतं आणि तिचं शरीर थिरकू लागतं. नवरा तिच्याकडे पाहतो तर त्याला विश्वासच होत नाही. तोंडावर हात घेऊन तो तिच्याकडे पाहत राहतो. हे वाचा - ...अन् नवरीबाईला सोडून वहिनीकडे पळाला दीर; लग्नातच आऊट ऑफ कंट्रोल झाला नवरदेव नवरी बसल्या जागेवरून हलत हलत उठते आणि सर्वांच्या मध्ये जाऊन तिथं नाचू लागते. नवरीबाईने नवरदेवाला दिलेलं हे सरप्राइझ. तिने लग्नात आपल्या लाइफ पार्टनरसाठी डान्स केला. डान्स आणि गाण्याच्या माध्यमातून तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. नवरी असं काही करणार आहे, याची पुसटशीही कल्पना नवरदेवाला नव्हती. त्यामुळे तिला असं काही करताना पाहून त्यालाही आश्चर्य वाटतं. हे वाचा - लग्नानंतर आनंद गगनात मावेना; रस्त्यावरच नाचू लागले नवरी-नवरदेव, जबरदस्त Dance Video याआधी एका नवरीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. निशिका खत्री द इन्फ्लुएन्सर इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात भरमंडपात नवरीबाई नवरदेवाला सोडून पळते आणि त्याच्यापासून दूर जाऊन असं काही करते की नवरदेव, नातेवाईक, पाहुणे सर्वजण नवरीकडे पाहतच राहिले. कुणीच विचार केला नव्हता की नवरीबाई असं काही करेल.
  View this post on Instagram

  A post shared by - (@wedding_fairs)

  बसल्या बसल्या नवरी नाचू लागते. नवरदेवाला ती धक्के मारतानाही दिसते. तेव्हा नवरदेवही लाजताना दिसतो. मग अचानक नवरी उठते आणि तिथून पळू लागते. सर्वांच्या समोर अगदी मधोमध जाते आणि डान्स करू लागते. 'पालकी में होके सवार चली रे, मैं तो अपने साजन के द्वार चली रे...' या प्रसिद्ध बॉलिवूड गाण्यावर ती जबरदस्त परफॉर्मन्स देते.
  Published by:Priya Lad
  First published: