वॉशिंग्टन, 14 मे : कोरोनामुळं सध्या महासत्ता असलेल्या अमेरिकेचेही कंबरडे मोडले आहे. अमेरिकेत सध्या कोरोना संक्रमणाची सर्वात जास्त प्रकरणं आहेत. असे असले तरी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मात्र लॉकडाऊन हटवण्याच्या विचारात आहेत. त्यांच्या या भुमिकेवर अनेकांनी टीका केली आहे. मात्र एक चिमुरडीनं ट्रम्प यांची केलेली नक्कल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. एका 4 वर्षाच्या चिमुरडीनं आपल्या बोबड्या भाषेत ट्रम्पची नक्कल केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एका मुलगा उभा राहून बोलताना दिसत आहे. त्याला एक महिला विचारते की, तू बोलला होतास की गायब होशील जादू केल्यासारखा. त्यावर मुलगा म्हणतो नाही...नाही. महिला पुन्हा म्हणजे, तुम्ही बोलला होतात की ता 15 लोकांना कोरोना आहे, हा आकडा शुन्य होईल. त्यावर मुलगा आणखी जोरात, नाही...नाही असे म्हणतो. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा मुलगा हुबेहुब ट्रम्प सारखं बोलत असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
वाचा-VIDEO : लॉकडाऊनमध्ये GYM सुरू करण्यासाठी तरुणांनी रस्त्यावर उतरत केलं आंदोलन
Who the hell did this pic.twitter.com/rCLyOmsXt6
— savageape (@savag3ap3) May 12, 2020
हा व्हिडीओ कोणी अपलोड केला याबाबक माहिती मिळाली नसली तरी, अमेरिकेच्या प्रसिध्द जिम्मी किमेल लाइव्हने हा व्हिडीओ आपल्या कार्यक्रमात दाखवला होता.
वाचा-Lockdown मध्ये कपालभाती करणारी ही खार झाली स्टार, पाहा VIDEO
वाचा-VIRAL VIDEO : बापरे! एवढ्या जोरात वारा आला की ट्रकच हवेत गरगर फिरला