नवी दिल्ली, 13 मे : निसर्गात कधी कुठे काय कसं घडेल याचा नेम नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. जोरात आलेल्या हवेमुळे ट्रक गरगर हवेत फिरून फुटपाथवर गेल्याचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये हवेचा दाब आणि ताकद किती असू शकते ते याचा अंदाज ट्रकच्या फिरण्यावरून आपण लावू शकतो. हा व्हिडीओ चीनमधील असल्याचं सांगितलं जात आहे. लाल सिग्नल लागल्यामुळे सर्व गाड्या थांबल्या होत्या. अचानक जोरात हवा येते आणि रस्त्यावर सर्वात पहिला उभा असलेला ट्रक या हवेच्या दबामुळे उलटा होता. हवेत हा ट्रक चक्रावती फिरतो आणि फुटपाथवर आदळतो. हा संपूर्ण प्रकार पाहून स्थानिकांनाही आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. हा व्हिडीओ चीनच्या यिंचुआन भागातील असल्याचं सांगितलं जात आहे. हा ट्क जेव्हा हवेत गरगर फिरतो त्याच वेळी इतर वाहानं मात्र सुरक्षित रस्त्यावर उभी आहेत. त्यांना काहीच होत नाही. हा व्हिडिओ चिनी माध्यमांनी ‘द पेपर’ यूट्यूबवर अपलोड केला आहे.
हे वाचा- लहान मुलांना कोरोनापासून वाचवण्यासाठी आला ‘वॉरिअर रोबोट’, पाहा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओनंतर अनेक युझर्सनी आश्चार्य व्यक्त केलं आहे. इतर हलक्या वजनाच्या कार मात्र हवेमुळे सुरक्षित रस्त्यावर उभ्या आहेत. त्यांना जराही धक्का लागला नाही. ट्रकचं वजन साधारण 1.8 टनहून अधिक असतानाही केवळ हवेच्या दाबामुळे तो हवेत कसा उडाला? हा प्रश्न मात्र सध्या तरी अनुत्तरीतच आहे. अनेकदा चक्रीवादळामुळे असे प्रकार घडत असतात असा दावा चीनच्या माध्यमांकडून करण्यात आला आहे. या घटनेदरम्यान ट्रक चालकानं सीटबेल्ट लावल्यामुळे त्याचा जीव वाचला असून किरकोळ दुखापत झाल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र या अजब व्हिडीओवर युझर्सनी अश्चार्य व्यक्त केलं आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे वाचा- या हॉटस्पॉटमधून दिलासादायक वृत्त! 213 रुग्णांना हॉस्पिटलमधून दिला डिस्चार्ज संपादन- क्रांती कानेटकर