मुंबई, 13 मे : कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. या व्हायरसचं संक्रमण टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमध्ये कोणी घरी बसून वेगवेगळ्या कला आणि छंद जोपासतंय तर कोण घरच्या कामांमध्ये मदत करताना दिसत आहे. प्रत्येक स्टार आपल्या सोशल अकाऊंटवर रोज नवीन व्हिडीओ पोस्ट करताना पाहायला मिळत आहे. या सगळ्या वातावरणात एक छोटी खारुताई मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या खारीचा व्हिडीओला सोशल मीडियावर तुफान लाइक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये कोरोनाचा धोका टाळण्यासाठी ही खारुताई कपालभाती प्राणायाम करताना दिसत आहे. शांतपणे बसून ती आपल्या श्वासावर लक्ष केंद्रीत करत हा प्राणायाम करताना पाहायला मिळत आहे. प्राणायमाचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहीत आहे मात्र आपण करायला आळस करतो. ही खार मात्र आपलं शरीर सुदृढ राहावं म्हणून हा प्राणायाम मोकळ्या हवेत येऊन करत असावी असं सोशल मीडियावर युझर्स म्हणत आहेत. या खारीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
Baba squirrel dev
— Levi (@AmanDRathi1) May 12, 2020
Now I gotta Baba Ramdev follow this squirrel 🤣
— shobhnarajput (@shobhnarajput16) May 12, 2020
योग आणि प्राणायाम मन आणि शरीर दोन्हीला तंदुरुस्त ठेवतं त्यामुळे दोन्ही गोष्टी लॉकडाऊनच्या काळात करणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. अनेक युझर्सनी ही खार बाबा रामदेव यांना फॉलो करत असल्याचंही म्हटलं आहे. या व्हिडिओमध्ये खार कोपऱ्यावर बसून श्वास घेताना आणि बाहेर सोडताना दिसत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 12 हजार लोकांनी पाहिला आहे. 997 युझर्सनी लाईक केलं असून 181 यूझर्सनी कमेंट्स केल्या आहेत. हे वाचा- एक बैल कमी पडला म्हणून गाडीला स्वत:ला जुंपलं, निःशब्द करणारा VIDEO हे वाचा- ज्याच्या घरी केली चोरी तोच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, आता चोरांची अशी झाली अवस्था हे वाचा- VIRAL VIDEO : बापरे! एवढ्या जोरात वारा आला की ट्रकच हवेत गरगर फिरला