VIDEO : लॉकडाऊनमध्ये GYM सुरू करण्यासाठी तरुणांनी रस्त्यावर उतरत केलं हटके आंदोलन

VIDEO : लॉकडाऊनमध्ये GYM सुरू करण्यासाठी तरुणांनी रस्त्यावर उतरत केलं हटके आंदोलन

लॉकडाऊनमध्येच रस्त्यावर उतरले तरुण आणि तरुणी, असं हटके आंदोलन तुम्ही कधीच पाहिलं नसेल.

  • Share this:

फ्लोरिडा, 13 मे : संपूर्ण जग सध्या कोरोनाची दोन हात करत आहे. या व्हायरसला रोखण्यासाठी जवळजवळ सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळं शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, मॉल्स, जिम इत्यादी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळं सध्या लोकं घरात कैद आहेत. मात्र आता लोकांचा संयम तुटत चालला असल्याचे दिसत आहे. विशेषत: सतत जिममध्ये वर्क आउट करणारी लोकं, घरात बसून कंटाळली आहे. म्हणून जिम सुरू करण्यासाठी चक्क लोकांनी रस्त्यावर आंदोलनं करण्यास सुरुवात केली आहे. सध्या या आंदोलनाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

डब्लूएफएलए (WFLA) न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार, फ्लोरिडातील काही तरुण-तरुणींनी रस्त्यावर उतरत आंदोलनं करण्यात सुरुवात केली. फ्लोरिडामधील जिम पुन्हा सुरू करण्याची मागणी ते करत होते. मात्र त्यांनी नारेबाजी करत हे आंदोलन केलं नाही तर पुश अप आणि व्यायाम करत हे आंदोलन केलं. दरम्यान फ्लोरिडामध्ये 30 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. येथील राज्यपालांनी लॉकडाऊनमध्ये जिम सुरू होणार नाही, अशी घोषणा केल्यानंतर या तरुणांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं.

वाचा-VIDEO : लॉकडाऊनमध्ये पोलिसाची 'सिंघम' गिरी, ड्यूटी सोडून करत आहे खतरनाक स्टंट

वाचा-कॅन्सरग्रस्त लेकीला कोरोनापासून वाचवण्यासाठी 50 दिवस दूर होता बाप, अखेर झाली भेट

दरम्यान, हे आंदोलन करतांना सामाजिक अंतर आणि लॉकडाऊनच्या नियमांचेही पालन तरुणांनी केले होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही लोकांनी आंदोलकांवर टीका केली आहे. तर, काहींनी त्यांचे समर्थन करत लॉकडाऊनमध्ये जिम सुरू करण्याची विनंती केली आहे.

वाचा-बघता-बघता नदीत तयार झाला खड्डा...समोर आलेलं सगळं केलं गिळंकृत, VIDEO VIRAL

First published: May 13, 2020, 3:19 PM IST

ताज्या बातम्या