जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पाण्यात नव्हे तर चक्क आकाशात उडताना दिसला मासा; तज्ज्ञांनी केला अजब दावा

पाण्यात नव्हे तर चक्क आकाशात उडताना दिसला मासा; तज्ज्ञांनी केला अजब दावा

पाण्यात नव्हे तर चक्क आकाशात उडताना दिसला मासा; तज्ज्ञांनी केला अजब दावा

फ्लोरिडामध्ये लोकांनी पाण्याच्या जागी माशाला आकाशात उडताना (Flying Fish Spotted in Florida) पाहिलं तेव्हा सगळेच हैराण झाले.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 13 नोव्हेंबर : जगभरातून एलियन्सबद्दलच्या अनेक बातम्या (Alien Stories) समोर येत असतात. एलियन्स म्हणजेच दुसऱ्या ग्रहावरील प्राणी. लॉकडाऊनच्या काळात एलियन्सबाबतच्या बातम्यांमध्ये आणखीच वाढ झाली आहे. विशेषतः अमेरिका एलियन्समुळे विवादात आलं आहे (Aliens And America Connection). अमेरिकेच्या सैन्यातील अनेक रिटायर्ड टॉप अधिकाऱ्यांनी असा दावा केला आहे की देश एलियन्सबद्दसच्या अनेक गोष्टी लपवत आहे. याला म्हणतात रुबाब; हत्तीच्या पिल्लाला मिळाली Z प्लस सुरक्षा, पाहा Viral Video या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की अमेरिका एलियन्सच्या संपर्कात आहे. मात्र ही गोष्ट ते जगापासून लपवत आहेत. मात्र, अमेरिकेनं ही बाब नाकारली आहे. आता फ्लोरिडामध्ये लोकांनी पाण्याच्या जागी माशाला आकाशात उडताना (Flying Fish Spotted in Florida) पाहिलं तेव्हा सगळेच हैराण झाले. हे प्रकरण याच आठवड्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. इथे आकाशात माशाप्रमाणेच एक जीव उडताना दिसला. यानंतर एलियन हन्टर्समध्ये गोंधळ उडाला. याला फ्लाईंग फिश असं नाव दिलं गेलं. काही लोकांचं असं म्हणणं आहे, की हे एलियन्सचं स्पेसक्राफ्ट आहे. तर, काही लोकांचं असं म्हणणं आहे की एलियन्सने या माशाला आकाशात उडवलं. UFOsightingdaily.com वर उडणाऱ्या माशाचा फोटो शेअर केला गेला आहे.

News18

एलियन एक्सपर्ट स्कॉट वरिंग यांच्या म्हणण्यानुसार, नुकतंच त्यांनी नोटीस केलं आहे की जिथे एलियन्स आणि यूएफओ दिसतं, त्याची साईज पृथ्वीवर वस्तूंप्रमाणेच आहे. मात्र यूएफओचा असा पहिलाच एलियन आता त्यांनी स्पॉट केला आहे, जो माशाप्रमाणे दिसतो. व्हायरल होणाऱ्या या एलियन फिशचे पुढच्या बाजूला दोन डोळे आहेत आणि मागचा भाग माशाप्रमाणे आहे. Yuck!पाउचमधून Tomato Sauce काढत होती तरुणी,बाहेर जे काही आलं ते पाहून बसला धक्का एक्सपर्टनं याला पाण्याच्या खाली असलेल्या सिक्रेट एलियन बेससोबतही जोडलं आहे. एलियन एक्सपर्ट स्कॉट वरिंग यांचं म्हणणं आहे, की समुद्राच्या खालील भागातही एलियन बेस आहे. डेली स्टारमध्ये आलेल्या एलियन फिशच्या या फोटोमुळे एकच वाद सुरू झाला. आतापर्यंत याबाबत काहीही स्पष्ट झालेलं नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात