मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /दीड लाखांच्या सर्जरीमुळे वाचलं माकड; प्राण्यावर पहिल्यांदाच झालं माणसाचं ऑपरेशन

दीड लाखांच्या सर्जरीमुळे वाचलं माकड; प्राण्यावर पहिल्यांदाच झालं माणसाचं ऑपरेशन

माकडावर इंटरलॉकिंग नेलिंग ऑपरेशन करण्यात आलं आहे.

माकडावर इंटरलॉकिंग नेलिंग ऑपरेशन करण्यात आलं आहे.

माकडावर इंटरलॉकिंग नेलिंग ऑपरेशन करण्यात आलं आहे.

भोपाळ, 10 सप्टेंबर : प्राणी आणि माणूस यांची शरीररचना वेगळी असते. त्यामुळे त्यांच्यावरील उपचाराच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात. शिवाय माणसांवर उपचारासाठी अवलंबवल्या जाणाऱ्या काही पद्धतींचा खर्च लाखोंच्या घरात असतो. माणसांवर केल्या जाणाऱ्या अशाच लाखो रुपयांच्या सर्जरीमुळे माकडाचा जीव वाचला आहे (Operation on Langoor monkey). प्राण्यावर पहिल्यांदाच माणसाचं ऑपरेश करण्यात आलं आहे  (Interlocking Nailing Operation).

मध्य प्रदेशमध्ये (Madhya pradesh) एका माकडाला माणसावर केल्या जाणाऱ्या ऑपरेशनमुळे (Monkey langoor bones break surgery) जीवनदान मिळालं आहे. जबलपूर वाइड लाइफ फॉरेन्सिक टीमने माकडावर (Langoor Operation) इंटरलॉकिंग नेलिंग ऑपरेशन केलं. यामुळे माकडाला नवं आयुष्य मिळालं आहे. माणसावर केली जाणारी ही सर्जरी राज्यात पहिल्यांदाच प्राण्यावर करण्यात आली आहे.

हे वाचा - Shocking! छातीचा झाला दगड, फुगू लागले ब्रेस्ट; सर्जरीनंतर महिलेची भयंकर अवस्था

10 दिवसांपूर्वी नरसिंहपूर जिल्ह्यात हे माकड गंभीर जखमी अवस्थेत सापडलं होतं. या माकडाला वनविभागाने उपचारासाठी जबलपूरच्या वेटनरी कॉलेजमध्ये आणलं. त्याच्या शरीरातील हाडं तुटली होती. पुढील आणि मागील दोन्ही थाय बोनचे तीन तुकडे झाले होते.  तिचा जीव वाचवणं आव्हानात्मक होतं.

या माकडाची अवस्था इतकी वाईट होती की ते पाहून माणसांवर जे ऑपरेशन केलं जातं ते या माकडावर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या ऑपरेशनसाठी एक ते दीड लाख रुपये खर्च येतो. जवळपास 4 तास हे ऑपरेशन झालं.

हे वाचा - ऑपरेशन करून पठ्याने लावले चक्क सोन्याचे केस

टीव्ही 9 हिंदीच्या वृत्तानुसार   डॉक्टर शोभा जावरे यांनी सांगितलं की, आता माकडाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे. ते पूर्णपणे बरं आहे की नाही हे 14 दिवसांनंतरच सांगता येईल. 14 दिवसांनंतर त्याचं एक्स-रे काढलं जाईल. यामध्ये हाडं पुन्हा जुडताना दिसली तर ऑपरेशन यशस्वी झालं, असं समजलं जाईल.

First published:
top videos

    Tags: Health, Lifestyle, Surgery, Wild animal