मुंबई, 01 सप्टेंबर : मासे (Fish video) खायला किती तरी जणांना आवडतं आणि हे मासे स्वतः पकडलेले (Fishing video) असतील तर ती खाण्याची मजा काही औरचं. पण अनेकदा मासेमारी उलट आपल्यावरच बेतते, याचा अनुभव बऱ्याच जणांना आला असेल. सध्या मासेमारीचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.
मासेमारी करायला गेलेल्या तरुणाच्या गळाला मासा लागला खरा पण तो इतका मोठा होता की त्या भल्यामोठ्या माशानेच त्या तरुणाला पाण्यात खेचून घेतलं (Fish pull man into water). मासेमारीचा हा व्हिडीओ पाहूनच धडकी भरते (Shocking video).
व्हिडीओत पाहू शकता एक तरुण तलावाच्या किनाऱ्यावर बसून मासे पकडतो आहे. लोरेंट स्जाबो असं या तरुणाचं नाव आहे. त्याने पाण्यात टाकलेल्या गळाला थोड्या वेळाने मासा अडकतो. मासा पाण्यातून बाहेर काढण्यासाठी तो आपली पूर्ण ताकद पणाला लावतो. पण मासा इतका मोठा होता की तो बाहेर येण्याऐवजी तरुणालाच तो पाण्यात खेचून घेतो. तरुण हळूहळू पूर्ण पाण्यात बुडतो.
हे वाचा - बापरे! बॉडी बिल्डर बनण्याच्या नादात भयंकर अवस्था; तरुणाचा Shocking video viral
तरुणाचं पाण्यात काय झालं असेल, अशीच भीती वाटते. पण सुदैवाने थोड्या वेळाने तरुण पाण्यातून बाहेर येतो. त्याने आपली मासे पकडण्याचा गळ आणि मासा दोघांनीही गमावलं. ही घटना सोमोगी काऊंटीतील असल्याचं सांगितलं जातं आहे. युट्यूबवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
हे वाचा - ऑनलाइन बैठकीदरम्यान मुलाने केलं असं कृत्य; महिला मंत्रीने मागितली माफी
नेटिझन्सना हा व्हिडीओ पाहून धडकीच भरली आहे. त्याच्या गळाला मोठी कॅटफिश लागली होती. बहुतेकांनी सुदैवाने ती फक्त एक कॅटफिश होती. मगर असती तर काय झालं असतं, अशी चिंता व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fish, Shocking viral video, Viral, Viral videos