मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /बापरे! बॉडी बिल्डर बनण्याच्या नादात भयंकर अवस्था; तरुणाचा Shocking video viral

बापरे! बॉडी बिल्डर बनण्याच्या नादात भयंकर अवस्था; तरुणाचा Shocking video viral

तरुणाचा जीममधील हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्काच बसेल.

तरुणाचा जीममधील हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्काच बसेल.

तरुणाचा जीममधील हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्काच बसेल.

मुंबई, 01 सप्टेंबर : सध्या इन्सटंट गोष्टीचं जणू फॅडच आहे. मग ती रेसिपी असो, सौंदर्य असो किंवा फिटनेस (Fitness video) असो. आपण फिट राहावं यासाठी लोक योगा करतात, एक्सरसाइझ (Excercise video) करतात. पण बहुतेकांना त्याचा लगेच परिणाम हवा असतो. मग यासाठी सप्लिमेंट किंवा कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त एक्सरसाइझ (Excessive excercise)  केली जाते. कोणतीही गोष्ट अति असो ती कितीही चांगली (Workout) असली तरी जास्त झाले की त्याचे गंभीर दुष्परिणाम (Excessive workout) होतातच. असाच एक व्हिडीओ (Gym video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) झाला आहे, जो पाहून तुम्हाला धक्काच (Shocking video) बसेल.

कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त एक्सरसाइझ केल्याने आपण जास्त फिट राहू किंवा आपली बॉडी लवकर होईल, जास्त होईल, असं किती तरी जणांना वाटतं. तुम्हालाही असंच वाटत असेल आणि तुम्हीसुद्धा जास्तीत जास्त बॉडी बनवण्यासाठी जास्तीत जास्त एक्सरसाइझ करत असाल तर मग हा व्हिडीओ नक्कीच पाहा.

व्हिडीओत पाहू शकता एक तरुण एक्सरसाइझ केल्यानंतर त्याला थोडं अस्वस्थ वाटू लागतं. तो आपल्या हातात पाण्याची बाटली घेऊन येतो आणि जीममधील जिन्यावर बसतो. किती तरी वेळ तो शांत बसून राहतो. त्याच्या छातीत वेदना होत असतात. छातीवर तो वारंवार हात लावताना दिसतो. थोड्या वेळाने तो तिथून उठतो आणि पुन्हा एक्सरसाइझ करायला जात असतो, पण पुन्हा तो तिथंच येऊन बसतो. थोडा वेळ तो तसाच बसतो आणि त्यानंतर जिन्यावरून तो धाडकन कोसळतो आणि जमिनीवर आडवाच होतो. व्हि़डीओ पाहून आपल्यालाही धडकी भरते.

हे वाचा - 4 महिन्यांची प्रेग्नंट वाटत होती; कुत्र्याने पोटावर उडी मारताच बाहेर पडला मृत्यू

giedde इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ सूरतच्या गोल्ड जिममधील आहे. हा तरुण 33 वर्षांचा असून त्याने जास्त वर्कआऊट केल्याने त्याचं हार्ट फेल झाल्याचं या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे. ही संपूर्ण घटना जीममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हे वाचा - आणखी एका महासाथीचं संकट! कोरोनाव्हायरसनंतर West Naile Virus चं थैमान

जे या तरुणासोबत घडलं ते तुमच्यासोबत होऊ देऊ नका. वर्कआऊट करताना स्वतःच्या मनानुसार करू नका. तुमच्या शरीराला झेपेल, तुमच्या शरीराची क्षमता आहे, इतकीच एक्सरसाइझ करा. शक्यतो तज्ज्ञांचा, जिम ट्रेनरचा सल्ला घ्या.

First published:

Tags: Shocking viral video, Viral, Viral videos