मराठी बातम्या /बातम्या /विदेश /VIDEO : ऑनलाइन बैठकीदरम्यान मुलाने केलं असं कृत्य; महिला मंत्रीला सर्वांसमोर मागावी लागली माफी

VIDEO : ऑनलाइन बैठकीदरम्यान मुलाने केलं असं कृत्य; महिला मंत्रीला सर्वांसमोर मागावी लागली माफी

वर्क फ्रॉम होमचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील. ऑनलाइन मीटिंग (Online Meeting) सुरु असताना काही विचित्र प्रकार घडल्याचे यापूर्वी अनेकदा आपण पाहिले आहेत.

वर्क फ्रॉम होमचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील. ऑनलाइन मीटिंग (Online Meeting) सुरु असताना काही विचित्र प्रकार घडल्याचे यापूर्वी अनेकदा आपण पाहिले आहेत.

वर्क फ्रॉम होमचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील. ऑनलाइन मीटिंग (Online Meeting) सुरु असताना काही विचित्र प्रकार घडल्याचे यापूर्वी अनेकदा आपण पाहिले आहेत.

    न्यूझीलंड, 1 सप्टेंबर : सुमारे दीड ते दोन वर्षांपासून जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा (Corona) कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी कडक निर्बंध किंवा लॉकडाउन जारी केला जात आहे. या स्थितीमुळे अनेक देशांमध्ये वर्क फ्रॉम होम (Work From Home) ही संकल्पना राबवली जात आहे. खासगी कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होम प्राधान्याने असले तरी शासकीय कार्यालये (Government Offices) देखील याला अपवाद नाहीत. न्यूझीलंडमधील (New Zealand) अनेक मंत्री आणि शासकीय अधिकारी अशाच प्रकारे घरुन कामे करत आहेत. वर्क फ्रॉम होमचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील. ऑनलाइन मीटिंग (Online Meeting) सुरु असताना काही विचित्र प्रकार घडल्याचे यापूर्वी अनेकदा आपण पाहिले आहेत. असाच काहीसा प्रकार न्यूझीलंडमधील एका महिला मंत्र्यासमवेत घडला. या घटनेचा व्हिडीओ या महिला मंत्र्याने (Minister) स्वतः सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला असून तो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. याबाबतचं वृत्त `लाइव्ह हिंदुस्थान डॉट कॉम`ने दिलं आहे.

    कोरोनामुळे वर्क फ्रॉम होमचा अवलंब अनेक देशांमध्ये सुरु आहे. न्यूझीलंडमध्ये बहुतांश शासकीय कामकाज वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून सुरु आहे. सध्या येथील एका महिला मंत्र्याच्या ऑनलाइन मीटिंग दरम्यानचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. `द गार्डियन`ने दिलेल्या वृत्तानुसार, या व्हिडीओतील महिला मंत्र्याचे नाव कार्मेल सपलोनी (Carmel Sapuloni) असून, त्या न्यूझीलंडच्या सामाजिक मंत्री आहेत. सपलोनी या एका लाइव्ह झूम मीटिंग (Zoom Meeting) दरम्यान ऑनलाइन मुलाखत देत होत्या. याचवेळी त्यांचा मुलगा किचनमधून थेट त्यांच्या खोलीत आला आणि हातातील गाजर दाखवू लागला. हे पाहताच त्या आपल्या मुलाला बाहेर पाठवू लागल्या.

    हे ही वाचा-VIDEO: छताला लटकताना दिसलं महिलेचं डोकं; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन

    परंतु, तो काहीएक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याच्या अशा पध्दतीने अचानक येण्याने सपलोनी यांना क्षणभर आश्चर्याचा धक्का बसला आणि त्या हसू लागल्या. एवढे होऊन सुध्दा त्यांचा मुलगा गाजर (Carrot) हातात घेऊन तेथेच उभा होता. सपलोनी आपल्या मुलाच्या हातातील गाजर हिसकावून घेण्याचा प्रयत्न त्या करु लागताच, मुलगा रुमबाहेर निघून गेला आणि मीटिंग पुन्हा सुरु झाली. मात्र या प्रकाराबद्दल त्यांना मीटिंग मध्ये सहभागी अन्य व्यक्तींची माफी मागावी लागली.

    हा व्हिडीओ शेअर करताना सपलोनी लिहितात की माझ्या मुलाच्या अशा कृत्यामुळे मला अपमानास्पद वाटत आहे. मात्र लोकांनी हा व्हिडीओ पाहताच हा व्हिडीओ चांगला असून, त्यात वाईट असे काहीच नाही, असं म्हटलं आहे. कार्मेल सपलोनी यांचा हा व्हिडीओ एकूणच जोरदार चर्चेत असून, तो व्हायरल होत आहे.

    First published:

    Tags: Live video viral, Social media, Viral video.