नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी : सोशल मीडियावर (Social Media) विविध प्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. पण आता एक असा व्हिडीओ समोर आला आहे, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. भारतीय वनसेना अधिकारी सुसंता नंदा (Susanta Nanda) यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये लांबलचक साप थेट एका माशाच्या तोंडात जात असल्याचं दिसतंय.
साप आणि माशाचा हा संपूर्ण थरार या व्हिडीओमध्ये दिसतो आहे. या व्हिडीओत एका तलावाठिकाणी एक मासा सापाची शिकार करण्याचा प्रयत्न करतो आहे. साप झाडांमध्ये लपलेला आहे. सापाला झाडांमधून बाहेर काढण्यासाठी मासा तोंडातून धूर सोडतो आणि नंतर पाण्यात निघून जातो.
(वाचा - रस्त्यावरुन जाता जाता एकाच वेळी तीन अभिनेत्रींसोबत साजरा केला Kiss Day; VIDEO सीसीटीव्हीमध्ये कैद)
जसा साप झाडातून बाहेर येतो, तसा मासाही पाण्यातून बाहेर येतो. पण साप माशाला पाहून पुन्हा झाडीत जातो. काही वेळ असं सुरुच राहतं. शेवटी साप माशाच्या तोंडात जातोच आणि हळू-हळू माशाच्या तोंडातून आता खाली खाली जाताना दिसतो. हा व्हिडीओ इथेच संपतो, परंतु याचा पुढील व्हिडीओ शोधून काढण्यात आला. व्हिडीओमध्ये दिसणारा सापासारखा प्राणी, खरंतर साप नसून तो एक मासाच आहे.
सापासारख्या दिसणाऱ्या या माशाला सिलेंडर फिश किंवा ईल फिश असं म्हटलं जातं. ज्या माशाने या सिलेंडर फिशला खाल्लं, तो मासा दिसायला लहान वाटत असला, तरी त्याचं पोट मोठं असतं.
If you haven’t seen this pic.twitter.com/pNoSKBbHtv
— Susanta Nanda IFS (@susantananda3) February 10, 2021
(वाचा - भुकेल्या बिबट्यांसाठी मांस घेऊन पोहोचले तरुण; कळपानं बिबटे आले आणि... पाहा VIDEO)
हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अनेकांची याला पसंती मिळत आहे. भारतीय वनसेना अधिकारी सुसंता नंदा अनेकदा असे प्राण्यांशी संबंधित व्हिडीओ शेअर करत असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fish, Viral videos