नवी दिल्ली 08 जानेवारी : अनेकांना मासेमारीची आवड असते. कधीकधी लोक आपली ही आवड पूर्ण करण्यासाठी दूरपर्यंत जातात. तासनतास नदी किंवा समुद्राच्या किनारी हे लोक फिरत राहतात. फिशिंग रॉड घेऊन त्याठिकाणी बसून राहतात. हे काम सहसा खूप मजेदार असतं, परंतु सध्या फिशिंगचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. Viral Video : समुद्रात माशांचे हाल होतानाचे व्हिडीओ पाहून म्हणाल… प्लास्टिक बंदी झालीच पाहिजे ट्विटर अकाउंट @weirdterrifying वरुन हा व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे, जो लगेचच व्हायरल झाला. यात मासेमारीसाठी पर्यटक बोटीने समुद्रात पोहोचल्याचं दिसून येतं. तो बोटीच्या कडेला झोपतो आणि आपली छोटी मासेमारीची काठी समुद्रात टाकतो. कदाचित इथे एखादा छोटा मासा असेल आणि तो त्याच्या जाळ्यात अडकेल याची त्याला खात्री असते. मात्र, पुढे जे होतं ते पाहून तो घाबरतो.
Fishing. pic.twitter.com/r1sa5LJKdT
— Weird and Terrifying (@weirdterrifying) January 7, 2023
अचानक एक मोठा मासा उडी मारून त्याच्या उजव्या हाताला चावा घेतो. पर्यटक आणि त्याच्या आजूबाजूला उभे असलेले लोक ओरडू लागतात. तरीही मासा हात सोडत नाही. अखेर हा पर्यटत माशाच्या तावडीतून आला उजवा हात सोडवतो, इतक्यात मासा पुन्हा त्याच्या डाव्या हाताला चावा घेतो. त्यानंतर इतर लोक माशाला पकडतात आणि बोटीवर आणतात, परंतु तरीही तो या व्यक्तीचा सोडत नाही. माशाच्या तावडीतून सुटण्याच्या नादात हा पर्यटक अनेकदा बोटीमध्येच पडतो मात्र तरीही मासा त्याला सोडत नाही. ३० सेकंदाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. जीवापेक्षाही फोटो महत्त्वाचा? मोबाईल घेऊन चक्क वाघाच्या मागे धावू लागला व्यक्ती, पुढे काय झालं पाहा..VIDEO लोकांची व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे. तो तीन लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. पाच हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला असून हजारो लोकांनी कमेंटही केल्या आहेत.
एका यूजरने लिहिलं की, अरे देवा, माणूसच इथे माशाचा चारा झाला आहे. दुसर्याने लिहिलं, कल्पना करा की मागे उभी असलेली स्त्री किती घाबरली आहे, किती ओरडत आहे. कदाचित तिला वाटत असेल की मासा आपल्याला खाऊन टाकेल. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून फिशिंग करताना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.