• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • Oh no! माशांना तोंडाने भरवण्याची हौस पडली भारी; तरुणासोबत काय घडलं पाहा VIDEO

Oh no! माशांना तोंडाने भरवण्याची हौस पडली भारी; तरुणासोबत काय घडलं पाहा VIDEO

नको त्या पद्धतीने माशांना भरवणं तरुणाला चांगलंच महागात पडलं.

  • Share this:
    मुंबई, 23 नोव्हेंबर : आपण कुठे फिरायला गेलो की पर्यटनस्थळी असलेल्या पक्ष्यांना (Feeding birds), प्राण्यांना खायला (Feeding animals) घालायला आपल्याला खूप आवडतं. पण प्राणी किंवा पक्षी यांना खायला घालताना आपणही सावध राहायला हवं, नाहीतर काय होऊ शकतं, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. माशांना (Fish video) खायला (Feeding fish) घालणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे (Fish attack on man). ज्या माशांना तो खायला घालत होता, त्याच माशाने तरुणाला पाण्यात खेचून घेतलं (Fish attack video). यात खरंतर या तरुणाचीच चूक. हा तरुण आपल्या तोंडाने या माशांना भरवत होता आणि माशांनी त्याच्यावरच हल्ला केला. धडकी भरवणारा हा असा व्हिडीओ आहे. पाहताच अक्षरशः काळजाचा ठोका चुकतो.
    resepmasakanidaman इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता एका काचेच्या टँकमध्ये भलेमोठे मासे आहेत. तरुणाने आपल्या तोंडाच एक छोटा मासा धरला आहे आणि टँकमधील माशांना भरवण्याचा प्रयत्न करतो. जसं तो तोंड पाण्याजवळ नेतो, तसे मासेही त्याच्या तोंडाजवळ येतात. काही सेकंदातच एक मासा त्या तरुणाच्या तोंडावरच हल्ला करतो आणि तरुणाचा तोल ढासळतो. माशांना खायला भरवता भरवता तरुणही पाण्याच्या टँकमध्ये कोसळतो.
    हे वाचा - आलं अंगावर घेतलं शिंगावर! सिंहाला रेड्याने हवेत गरागरा फिरवलं; खतरनाक VIDEO याआधीसुद्धा एका तरुणीसोबत असं घडलं होतं. ही तरुणी समुद्रातील माशांना स्वतःच्या हाताने खायला घालत होती, तेव्हा भल्यामोठ्या माशाने तिला पाण्यात खेचून घेतलं. ही घटना फ्लोरिडातील आहे. द रेप्टाइल झूच्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक महिला पालथं राहून माशांना खायला घालण्याचा प्रयत्न करते आहे. आपल्या हातात पाण्याच्या दिशेने तिने छोटे मासे धरून ठेवले आहेत. हे मासे ती माशांना खायला देत असते. पण तिथं काही पक्षी तिच्या हातातील मासे खायला येतात. ज्या माशांना ती आपल्या हाताने भरवण्यासाठी आतुर असते, ते मासे काही तिच्या हातातील खाणं खायला येत नाही. खूप वेळ प्रयत्न केल्यानंतर एक भलामोठा मासा येतो आणि तो चक्क तिचा हातच आपल्या जबड्यात धरून तिला पाण्यात खेचतो. महिला धाडकन पाण्यात कोसळते. त्यावेळी आपल्याही हृदयाची धडधड वाढते. सुदैवाने तिला काही होत नाही. हे वाचा - Black Cobra पितोय ग्लासमधून पाणी, VIDEO पाहून फुटेल घाम एकंदर व्हिडीओ पाहता माशाने तिला मुद्दाम पाण्यात खेचलं नाही तर तो जेव्हा तिच्या हातातील खाणं खायला येतो. तेव्हा तिचा हातही खेचला जातो आणि त्यामुळे ती पाण्यात पडते. महिलेला आपण पाण्यात पडल्याची भीती वाटत नसेत तर तिच्या चेहऱ्यावर माशाने आपल्या हाताने भरवलेला मासा खाल्ला याचा आनंद झळकताना दिसतो.
    Published by:Priya Lad
    First published: