मुंबई, 22 नोव्हेंबर : आपल्या प्रिय व्यक्तीला कुणी काही केलं तर आपल्याला किती राग येतो. हे फक्त माणसांमध्येच नाही तर अगदी प्राण्यांमध्येही (Animal video) दिसून येतं. असाच एक व्हिडीओ (Animal fighting video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात एका रेडा आपला साथीदाराला वाचवण्यासाठी चक्क सिंहाशी भिडला (Buffalo Attacks on Lion). एका रेड्याने म्हशीसाठी थेट सिंहांशीही लढा दिला आहे (Lion buffalo video).
रेड्याची शिकार आलेल्या सिंहाला दुसऱ्या रेड्याने चांगलाच धडा शिकवला आहे. सिंहाने रेड्यावर हल्ला करताच दुसरा रेडा धावत आला आणि त्याने सिंहाला आपल्या शिंगावरच उचलून गरागरा फिरवलं आणि त्यानंतर जमिनीवर आपटलं आहे. रेड्याने हल्ला केल्यानंतर शिकारीसाठी आलेला सिंहसुद्धा धूम ठोकून पळाला.
View this post on Instagram
व्हिडीओत पाहू शकता एक रेडा निवांत बसला आहे. झाडांमधून एक सिंह हळूच येतो आणि तो त्या रेड्यावर हल्ला करण्याच्या तयारीतच असतो. रेड्याजवळ तो पोहोचतो आणि त्याच्यावर हल्ला करणार तोच इतर रेडे ते पाहतात.
हे वाचा - लय भारी! माकडाचं हुला हुपिंग; कमरेभोवती कशी गरागरा फिरवली रिंग पाहा VIDEO
आपल्या साथीदाराचा जीव धोक्यात असल्याचं पाहून एक रेडा धावत त्याच्या मदतीसाठी येतो. सिंहाला शिकार करताना पाहून तो चवताळतो आणि पळत येत त्याला आपल्या शिंगावर घेतो. शिंगावर घेऊन तो त्याला हवेत उडवतो. सिंह हवेत गोल फिरतो आणि त्यानंतर रेडा त्याला धाडकन जमिनीवर आपटतो. रेडा पुन्हा एका सिंहाला आपल्या शिंगांनी मारतो. रेड्याचा रुद्रावतार पाहून सिंहही हादरला. शिकार सोडून त्याने आपला जीव वाचवण्यासाठी तिथून काढता पाय घेतला. रेड्याला घाबरून सिंह पळून गेला.
हे वाचा - पाणी पित असतानाच बिबट्याचा हल्ला; जीव मुठीत घेऊन पळालं हरण अन्..., पाहा VIDEO
wonderfuldixe इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos, Wild animal