अत्यंत विषारी म्हणून ओळखला जाणारा (Video of black Cobra drinking water from glass goes viral) काळा कोब्रा ग्लासमधून पाणी पित असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. वास्तविक, कोब्रा हा अत्यंत धोकादायक साप (Cobra is one of the dangerous snake) मानला जातो. लोक जेवढे वाघ, सिंह किंवा हत्तीला घाबरतात, तेवढेच ते नागालाही घाबरतात. नागाचं विष काही मिनिटांत माणसाचा जीव घेऊ शकतं. त्यामुळेच नागापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लोक त्यापासून (Fear of snake) दूर पळताना दिसतात. नाग दिसताच लोक त्यापासून सुरक्षित अंतरावर जाऊन उभं राहणं पसंत करतात. कुठला नाग कधी हल्ला करेल आणि आपल्याला दंश करेल, याचा भरवसा वाटत नसल्यामुळे अनेकांना नागांची धास्ती वाटते.
नागाला पाजलं पाणी या व्हिडिओत एक व्यक्ती नागाला ग्लासमधून पाणी पाजताना दिसत आहे. ही व्यक्ती सुरुवातीला नागासमोर पाण्यानं भरलेला एक ग्लास धरते. नाग थेट यातील पाणी पित नाही. अगोदर तो जिभ बाहेर काढून पाण्याची चव घेतो. मग खात्री पटल्यानंतर तो ग्लासमध्ये तोंड घालून पाणी पिऊन टाकतो. ग्लासमध्ये तोंड घालून पाणी पिणारा कोब्रा नाग हे अत्यंत दुर्मिळ दृश्य या व्हिडिओतून बघायला मिळतं. त्यामुळेच या व्हिडिओला युजर्सची जोरदार पसंती मिळताना दिसत आहे. हे वाचा - ‘बिग बॉस मराठी 2’ विजेत्याच्या गाडीला भीषण अपघात, अभिनेता गंभीर जखमी व्हिडिओ आहे भयानक हा व्हिडिओ अत्यंत भयानक असल्याच्या प्रतिक्रिया युजर्सनी दिल्या आहेत. मुळात एखाद्या व्यक्तीनं कोब्राच्या इतकं जवळ जाणं, हीच भयावह कल्पना असल्याचं मानलं जातं. त्यात हातात ग्लास पकडून तो स्थिर ठेवणं आणि कोब्रापुढे पकडणं हे तर डेअरिंगचंच काम. हा व्हिडिओ पाहूनच अनेकांना घाम फुटला आहे. कुणी एवढं डेअरिंग कसं काय करू शकतं, असा प्रश्न युजर्सना पडला आहे. हातमोजे घातले तरी कोब्रा दंश करू शकतो, असा इशाराही काही युजर्सनी दिला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.