जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बापरे! धगधगत्या आगीत नवरा-नवरीचा 'रोमान्स'; Wedding Video पाहून सर्वांना फुटला घाम

बापरे! धगधगत्या आगीत नवरा-नवरीचा 'रोमान्स'; Wedding Video पाहून सर्वांना फुटला घाम

नवरा-नवरीभोवती आग.

नवरा-नवरीभोवती आग.

लग्नात डान्स, रोमान्ससह या नवरा-नवरीने खतरनाक स्टंटही केला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 17 ऑक्टोबर : आगीशी कधीच खेळ करू नये, असं सांगितलं जातं. पण बरेच लोक लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी काहीही करतात. आता सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या लग्नाच्या व्हिडीओ मध्येच पाहा. ज्यात नवरा-नवरी ने आपला लग्नाचा क्षण खास बनवण्यासाठी आपल्याच लग्नात आग लावली. चारही बाजूंनी आग आणि मध्ये नवरा-नवरीचा रोमान्स. आग लागली तरी नवरा-नवरीने आपला रोमान्स सोडला नाही. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल. लग्नाचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही भावुक, काही मजेशीर असतात. पण लग्नाचा हा व्हिडीओ मात्र धडकी भरवणारा आहे. कारण नवरा-नवरीने नको ती डेअरिंग केली आहे. लग्नात डान्स, रोमान्ससह या नवरा-नवरीने खतरनाक स्टंटही केला. हे पाहून तिथं उपस्थितांनाही घाम फुटला पण नवरा-नवरी मात्र एकदम रिलॅक्स होते. हे वाचा -  VIDEO - नवरीसमोर अति उत्साह, जोश पडला महागात; लग्नाच्या दिवशीच नवरदेव रुग्णालयात व्हिडीओत तुम्ही पाहू शकता नवरा-नवरी डान्स करत आहेत. दोघंही एकमेकांमध्ये हरपून गेले आहेत. त्यांना कशाचंच भान राहिलं नाही आहे. इतक्यात दोन तरुण त्यांच्या चारही बाजूने एक ज्वलनशील पदार्थ टाकतात आणि त्यानंतर आग लावतात. पण तरी नवरा-नवरी आपला डान्स थांबवत नाहीत. डान्स करत करत त्यांचा रोमान्स सुरूच असतो. चारही बाजूंनी आगीच्या ज्वाळा असतात आणि त्याच्या आत एकमेकांचा हात धरून डान्स करत असतात. तसं पाहिलं तर ही आग लागली नाही आहे. म्हणजे आग मुद्दाम लावली गेली आहे. नवरा-नवरीने या आगीने तयार झालेल्या हार्टमध्ये रोमँटिक डान्स केला. पण तरी हा व्हिडीओ पाहताना आपल्या अंगावर मात्र काटा येतो. हे वाचा -  तिच्यासाठी Moon Tour चं तिकीटही बुक! खरंच बायकोला चंद्रावर नेणारा असा जगातला पहिला नवरा हा व्हिडीओ नेमका कुठला आहे माहिती नाही. @edi_musaku इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्यात कमेंट येत आहेत. आपल्या लग्नाला खास बनवण्यासाठी लोक काहीही करतात, यामुळे काही दुर्दैवी घडायला नको, अशा कमेंट यावर नेटिझन्सनी केल्या आहेत.

जाहिरात

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात