जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - नवरीसमोर अति उत्साह, जोश पडला महागात; लग्नाच्या दिवशीच नवरदेव रुग्णालयात

VIDEO - नवरीसमोर अति उत्साह, जोश पडला महागात; लग्नाच्या दिवशीच नवरदेव रुग्णालयात

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

नवरीला पाहताच रोमँटिक झालेला नवरदेव असं काही करायला गेला की त्याच्यासोबत घडली भयंकर दुर्घटना.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

सिडनी 04 सप्टेंबर :  लग्नाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यात तुम्ही नवरा-नवरीने लग्नाच्या ड्रेसमध्ये एकमेकांना पाहिल्यानंतर इमोशनल झाल्याचं किंवा त्यांच्या मनात लड्डू फुटल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर झळकलेलं तुम्ही पाहिलं असेल. असाच एक नवरदेव आपल्या नवरीला पाहून आऊट ऑफ कंट्रोल झाला. नवरीला पाहताच त्याला असा रोमान्स चढला की लग्नमंडपातून थेट रुग्णालयात पोहोचला. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत नवरदेवासोबत जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता हातात माईक धरून नवरदेव गाणं गाताना दिसतो आहे. नवरीला पाहून तो रोमँटिक झाला आहे. नवरीसमोर नवरीसाठी रोमँटिग साँग गातो आहे. त्याचवेळी त्याचे मित्रही त्याला साथ द्यायला येतात. गाता गाता तो डान्स करायला जातो आणि त्याच क्षणी त्याचा तोल जातो आणि तो धाडकन कोसळतो. तो हातांवर पडल्याचं दिसतो. हे वाचा -  लग्नात पाहुण्याचं असं कृत्य की, वधू-वरांनी व्हिडीओ पाठवून मागितली नुकसान भरपाई ही दुर्घटना इतकी मोठी होती की नवरदेवाला लग्नमंडपातून स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेण्याची वेळ आली.  माहितीनुसार त्याच्या कोपऱ्याला दुखापत झाली आहे. कोपरातील हाड तुटलं आहे. या दुर्घटनेनंतर कपलला आपल्या लग्नाची पहिली रात्रही हॉस्पिटलमध्ये घालवावी लागली.  नवरीने याचा एक फोटोही पोस्ट केला आहे. ज्यात ती ब्राइडल ड्रेसमध्ये हॉस्पिटलमध्ये नवरदेवाच्या शेजारी झोपलेली दिसते. तसंच नवरदेवाने बिअरही घेतली होती. तो नशेत होता, त्यामुळे त्याचा तोल गेला, असं नवरीने सांगितलं. हे वाचा -   उंच डोंगराच्या कडेला गर्लफ्रेंडला प्रपोज करायला खाली बसला, पण तोल गेला अन्… VIDEO VIRAL डेली मेल च्या रिपोर्टनुसार ही घटना मार्चमधील आहे. पण आता याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात