वॉशिंग्टन, 15 ऑक्टोबर : तुझ्यासाठी मी आकाशातील चंद्र -तारे तोडून आणेन, तुला चंद्रावर नेईन… असे एक ना दोन प्रेमात अशी कितीतरी वचनं दिली जातात, स्वप्नं दाखवली जातात. प्रत्यक्षात ही स्वप्नं साकार करणं काही शक्य नाही, याची कल्पनाही असते. पण एका व्यक्तीने मात्र हे अशक्य शक्य करण्याच्या दिशेने पाऊल टाकलं. एका नवऱ्याने बायकोसाठी चंद्र-तारे जमिनीवर आणले नाहीत पण तिलाच तो चंद्रावर नेणार आहे. बायकोला चंद्रावर नेणारा हा जगातील पहिला नवरा असेल. बायकोला मून टूरवर नेणाऱ्या या व्यक्तीचं नाव डेनिस टिटो आहे. 82 वर्षांचा डेनिस अमेरिकेतील बिझनसमन आहे. त्याने स्वतःसाठी आणि बायकोसाठी असे चंद्रावर जाण्याचे दोन तिकीट बुक केले आहेत. डेनिस जगातील पहिला स्पेस टुरिस्टही आहे. 2001 साली त्याने स्वतःच्या पैशाने अंतराळात फिरणारी पहिली व्यक्ती म्हणून रेकॉर्ड केला होता. रशियन स्पेसक्राफ्टमार्फत तो स्पेसमध्ये गेला होता. त्यावेळी रशियन स्पेस एजन्सीला पैशांची गरज होती आणि डेनिसने त्यांना 160 कोटी रुपये दिले होते. त्यानंतर तो इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये गेला होता. नासामार्फत याला विरोध झाला होता आणि टिकाही झाली होती. हे वाचा - चंद्रावर सापडली अशी वस्तू की तुम्ही म्हणाल चांदोमामा आता दूर नाही आता तो आपल्या पत्नीसह अंतराळात जाण्याच्या तयारीत आहे. एलन मस्कची कंपनी स्पेसएक्स स्पेस टुरिझमच्या तयारीत आहेत. याच मिशनचा भाग म्हणून डेनिसने तिकीट बुक केले आहेत. स्पेसएक्सने स्टारशिप रॉकेटचा प्रोटोटाइम तयार केला आहे. ज्यातून डेनिस चंद्रावर जाणार आहे.
डेनिसने स्पेसएक्ससह ऑगस्ट 2021 मध्ये एक करार केला होता. त्यानुसार पुढील 5 वर्षांत त्यांना कधीही अंतराळ यात्रा करता येईल. दरम्यान स्पेसएक्सचे हे मिशन कधी सुरू होणार, याला किती खर्च येणार याबाबत अद्याप स्पेसएक्सने माहिती दिलेली नाही.
(फोटो - Twitter/@cbs_spacenews)
डेनिसने स्वतः एरोनॉटिक्स आणि एस्ट्रोनॉटिक्स इंजीनियरिंगचं प्रशिक्षण घेतलं आहे. 1960 च्या दशकात तो नासाच्या जेड प्रोपल्शन लॅबमध्ये कामही करत होता. त्यानंतर त्याने स्वतःची इन्वेस्टेमेंट मॅनेजमेन्ट फर्म सुरू केली. एपी न्यूज एजन्सीशी बोलताना अंतराळ प्रवासासाठी पैसे द्यायला आपल्याला काहीच वावगं वाटत नाही, असंही त्याने सांगितलं. मोफत चंद्रावर जाण्याची संधी जपानचे अब्जाधीश युसाकू मेजवा एलन मस्कच्या स्पेसएक्स विमानातून चंद्रावर यात्रा करणार आहेत. स्पेसएक्समार्फत 2018 साली चंद्रावर यात्रेसाठी मेजवा यांची पहिला खासगी प्रवासी म्हणून निवड करण्यात आली होती. या मिशनचं नाव आहे, डिअर मून. 2023 मध्ये ही मोहीम होणार आहे. हे वाचा - चंद्रावर जाऊन Moon Walk करू शकले नाहीत Astronauts!, NASA चा Video Viral मेजवा यांनी या यात्रेत आपल्यासोबत आणखी 8 जणांना येण्याची ऑफर दिली. त्यांचा सर्व खर्च आपण करणार असल्याचंही घोषणाही त्यांनी केली होती. त्यांनी याबाबत ट्विटर व्हिडीओही पोस्ट केला होता. पण यासाठी त्यांनी दोन अटी ठेवल्या. पहिली अट म्हणजे ती व्यक्ती जे काही काम करत आहे, ते अशा पद्धतीनं पुढे न्यावं ज्यामुळे इतर लोक आणि समाजाची मदत होईल. आणि दुसरी अट म्हणजे त्यांच्याप्रमाणे समान आकांक्षा ठेवणाऱ्या इतर चालक दलाच्या सदस्यांचंही त्यांनी समर्थन करावं.