नवी दिल्ली 13 मे : कुठलाही देश असला तरी एखाद्या पार्टीत संगीत जरा जोरात वाजलं की शेजाऱ्यांना याचा त्रास होऊ लागतो. असाच काहीसा प्रकार अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये घडला आहे. जेव्हा एक पंजाबी कुटुंब लग्नाआधी सेलिब्रेशन करत होतं. सेलिब्रेशनदरम्यानच पोलीस तिथे पोहोचले आणि पोलिसांना तिथे पाहताच पार्टीतील पाहुणे घाबरले. मात्र पुढे जे घडलं (Cops Dance In Wedding Celebration) ते खूपच आगळंवेगळं आणि अनपेक्षित होतं. Shocking Video! लग्न होताच नवरा-नवरीने स्वतःला पेटवून घेतलं; पाहुणे मात्र पाहून हसू लागले पंजाबी कुटुंबातील मनविंदर तूरच्या लग्नाआधीच्या सेलिब्रेशनसाठी ही पार्टी ठेवण्यात आली होती. तो काही मित्र आणि कुटुंबियांसोबत हा आनंद साजरा करत होता. यावेळी मोठ्याने पंजाबी गाणी वाजवली जात होती. आवाज मोठा झाल्यावर कोणीतरी याबाबत पोलिसांत तक्रार केली. तक्रार मिळाल्यानंतर गाणी बंद करण्यासाठी दोन पोलीस अधिकारी तिथे पोहोचले.
This is what happened when @SJSheriff deputies were called to a Punjabi Wedding to shut it down… they decided to turn it up! 🎶
— Madison Wade (@madisoncwade) April 15, 2022
People involved in the wedding tell me they loved the deputies’ energy and respect! @ABC10 pic.twitter.com/oIPYCWtzvK
तक्रार मिळाल्यानंतर सॅन जोक्विन काउंटी शेरीफ ऑफिसचे अधिकारी तिथे पोहोचले. खरंतर पार्टीत संगीत जोरात वाजत होतं. त्यामुळं पोलिसांना पाहून घरातील सदस्य घाबरले, मात्र पोलीसच पंजाबी गाण्यांच्या तालावर नाचू लागले. डान्स फ्लोअरवर नाचणाऱ्या लोकांमध्ये पोलिसही सहभागी झाले. ABC10 शी बोलताना मनप्रीत तूरने सांगितलं की, घराबाहेर एक सेलिब्रेशन होतं, त्यामुळे संगीत जोरात होतं. पोलीस हे थांबवतील असं त्यांना वाटलं, पण पुढे पोलिसांनी जे केलं ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बापरे! वरात आहे की त्सुनामी; जेवणाऱ्या काऊंटरच्या दिशेने धावत सुटले पाहुणे, Video Viral व्हिडिओ ट्विट करताना ABC10 च्या अँकरने लिहिलं की, पंजाबी वेडिंगमध्ये संगीत थांबवण्यासाठी पोलीस पोहोचले तेव्हा हा प्रकार घडला. लोकांना त्यांची ऊर्जा आणि अॅटिट्यूड खूप आवडला. यावर रिप्लाय करत, सॅन जोक्विन काउंटी शेरिफच्या कार्यालयातून असं लिहिलं गेलं की तिथे आलेल्या पोलिसांना त्यांचा आदरातिथ्य आवडला आणि त्यांनी संगीताचा आवाज कमी करण्यास सहमती दर्शविली. या व्हिडिओला 40 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं असून त्यावर मजेशीर कमेंट्स करत पोलिसांचं कौतुक केलं आहे.