Home /News /viral /

बापरे! वरात आहे की त्सुनामी; जेवणाऱ्या काऊंटरच्या दिशेने धावत सुटले पाहुणे, Video Viral

बापरे! वरात आहे की त्सुनामी; जेवणाऱ्या काऊंटरच्या दिशेने धावत सुटले पाहुणे, Video Viral

हा व्हिडीओ पाहून तुमचं हसू थांबणार नाही.

  दिल्ली, 12 मे : सध्या लग्नाचा सीजन सुरू आहे. लग्न समारंभ आणि वरारीत लोक मोठ्या संख्येने सामील होतात. लग्नात जेवणाच्या पंक्ती हा आकर्षणाचा बिंदू असतो. लग्नात काय काय खायला मिळणार, यासाठी वरातीतील पाहुणेही प्रतीक्षेत असतात. नाचत-गाजत आलेल्या पाहुण्यांची गर्दी थेट खाण्यासाठी धावली, असं झालं तर? सोशल मीडियावर लग्न समारंभाचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये लग्नाच्या वरातीतील पाहुणे खाण्यासाठी तुटून पडतात. अनेक दिवसांपासून न खाल्ल्या प्रमाणे वरातीतील मोठी गर्दी थेट जेवणाच्या काऊंटच्या दिशेने धावू लागते. वरातीतील पाहुण्यांची गर्दी पाहून जेवण वाढणारे वेटरही आपली जागा सोडून पळून जातात. यानंतर जेवणाची जी काही अवस्था झाली ती पाहून तुम्हालाही धक्का बसेल. आतापर्यंत साडे तीन कोटींवेळा पाहिला गेला व्हिडीओ... हा व्हिडीओ सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत तब्बल साडे तीन कोटींपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आला आहे. तर 18 लाखांहून अधिकांनी पाहिला आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, मोकळ्या मैदानात बफे पद्धतीने जेवण सुरू आहे. त्याचवेळी पाहुण्यांची मोठी गर्दी बॅरीकेट तोडून आत शिरते. हे पाहून वेटरही हैराण होतात आणि पळून जातात.
  व्हिडीओ पाहून अंदाज येऊ शकतो की, पाहुणे किती भुकेले आहेत. आणि बऱ्याच वेळेपासून जेवण सुरू होण्याची प्रतीक्षा करीत होते. जेव्हा त्यांचं नियंत्रण सुटलं तेव्हा मात्र ते जेवणाच्या दिशेने धावत सुटले. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक वयस्क व्यक्ती जेवणाच्या दिशेने धावत आहे.  यानंतर पाहुणे पटापट ताट भरून घेताना दिसत आहे. जेवण संपेल या भीतीने सर्वजण घाईघाईने काऊंटरच्या दिशेने पळाले.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Funny video, Marriage, Video viral

  पुढील बातम्या