मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO: केसांना धरून ओढलं; मग जमिनीवर पाडत फरफटत नेलं अन्..., भररस्त्यात तरुणींचा धिंगाणा

VIDEO: केसांना धरून ओढलं; मग जमिनीवर पाडत फरफटत नेलं अन्..., भररस्त्यात तरुणींचा धिंगाणा

व्हिडिओमध्ये दिसतं, की एक तरुणी दुसरीला मारहाण करत आहे आणि आसपासचे लोक तिला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही घटना लखनऊच्या आशियाना क्षेत्रातील असल्याचं म्हटलं जात आहे.

  • Published by:  Kiran Pharate

लखनऊ 27 ऑक्टोबर : भररस्त्यात भांडण करणाऱ्या दोन तरुणींचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Social Media Viral) होत आहे. तपासात असं समोर आलं आहे, की हा व्हिडिओ उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ (Lucknow Viral Video) येथील आहे. या तरुणींना रस्त्यावरच गोंधळ घातला. यात एका तरुणीनं भररस्त्यातच दुसरीची धुलाई केली (Fight Breaks Between Girls on Road). व्हिडिओमध्ये दिसतं, की एक तरुणी दुसरीला मारहाण करत आहे आणि आसपासचे लोक तिला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही घटना लखनऊच्या आशियाना क्षेत्रातील असल्याचं म्हटलं जात आहे.

VIDEO - ...अन् नवरदेवाला सोडून पळाली नवरी; असं काही केलं की सर्वजण पाहतच राहिले

पीडित महिलेनं आरोप केला आहे, की एक मुलाने तिला लग्नाचं आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर आपल्या मैत्रिणींकडून तिला मारहाण करून घेतली. या घटनेनंतर आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनंतर पंधरा दिवसांनी केस दाखल झाली आहे. झी न्यूजनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी आरोपी तरुणाच्या विरोधात लैंगिक शोषण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. इतर दोन मुलींविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लखनऊमध्ये भररस्त्यात सुरू असलेली ही हाणामारी बघताच तिथे गर्दी जमा झाली. लोक या घटनेचा व्हिडिओ बनवू लागले. व्हायरल व्हिडिओच्या आधारे तरुणीने ठाण्यात केस दाखल केली.

मोठ्या दिमाखात स्टंट करायला गेला अन् तोंडावर आपटला; हा VIDEO पाहून नेटकरी लोटपोट

पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं, की सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल. त्यांना अटक करण्यासाठी एक टीम नेमण्यात आली आहे.

First published:

Tags: Shocking video viral