जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हाय हिल्स घालून रस्त्यावरच तरुणींची हाणामारी; काठी अन् बेल्टने एकमेकींवार वार, Shocking Video

हाय हिल्स घालून रस्त्यावरच तरुणींची हाणामारी; काठी अन् बेल्टने एकमेकींवार वार, Shocking Video

हाय हिल्स घालून रस्त्यावरच तरुणींची हाणामारी; काठी अन् बेल्टने एकमेकींवार वार, Shocking Video

व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या तरुणी अचानक आपसात भांडू लागल्याचं पाहायला मिळतं (Gang War of Girls). सोशल मीडियावर तरुणींमधील गँगवॉरचा हा व्हिडिओ समोर आला आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 14 मार्च : अनेकदा आपण मुलांमधीलच दोन गट आपसात भांडताना बघतो. दोन गट जेव्हा आपसात भिडतात आणि वाद जास्त वाढतो तेव्हा ते वेगवेगळे हत्यार घेऊनही तिथे पोहोचतात. मात्र जेव्हा हे प्रकरण पोलिसांत जातं तेव्हा त्यांना अद्दल घडते. आता मुलीदेखील यात कमी नाहीत. अनेक शाळा आणि कॉलेजमध्येही आपल्याला पाहायला मिळतं की एखाद्या मुद्द्यावरुन मुलींचे दोन गट आपसात भिडतात आणि हाणामारीही करतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Fight Video Viral) झाला आहे. Shocking! उंच डोंगरावर उभा राहून घेतली उडी; तरुणाचा VIDEO पाहून संतापले नेटकरी व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या तरुणी अचानक आपसात भांडू लागल्याचं पाहायला मिळतं (Gang War of Girls). सोशल मीडियावर तरुणींमधील गँगवॉरचा हा व्हिडिओ समोर आला आहे. यात रस्त्याच्या कडेला अनेक तरुणी उभा असल्याचं दिसतं. इतक्यात काहीतरी कारणावरुन त्या आपसात भिडतात. यात काहींच्या हातात काठी दिसते तर काहींच्या हातात बेल्ट.

जाहिरात

या तरुणी एकमेकींना मारहाण करण्यास सुरुवात करतात. यात दिसतं की एकीने कानशिलात लगावताच दुसरी तिचे केस पकडते आणि ओढते. रस्त्यावरच तरुणींमध्ये सुरू असलेल्या या मारहाणीचा व्हिडिओ कोणीतरी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आणि आता तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

चिमुकलीला पाहाताच चवताळली मेंढी; धावत येत केला हल्ला अन्…, धडकी भरवणारा VIDEO

या तरुणींमध्ये नेमका कोणत्या कारणावरुन वाद झाला आणि हे प्रकरण कुठलं आहे, हे समोर आलेलं नाही. हा व्हिडिओ पाहून नेटकरी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं ‘बघा मुलांनो, खऱ्या प्रेमासाठी मुली काय काय करतात.’ दुसऱ्या एकाने लिहिलं, या भांडणही किती मेकअप करून करतात. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ only._.sarcasm_ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात