मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Shocking! उंच डोंगरावर उभा राहून घेतली उडी; तरुणाचा VIDEO पाहून संतापले नेटकरी

Shocking! उंच डोंगरावर उभा राहून घेतली उडी; तरुणाचा VIDEO पाहून संतापले नेटकरी

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल (Dangerous Stunt Video Viral) होत आहे. यात एक व्यक्ती घातक ठिकाणी एका उंच डोंगरावर उभा पाहून ब्लॅकफ्लिप मारताना दिसतो (Backflip on Mountain)

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 14 मार्च : एक काळ होता जेव्हा चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट पाहायला मिळायचे. मात्र आजकाल ही बाब अतिशय सामान्य झाली आहे. तुम्ही कुठेही गेला तरी कोणी ना कोणी आजूबाजूला स्टंट करत असल्याचं तुम्हाला दिसेलच. आजकाल लोकांमध्ये स्टंटचं क्रेज जरा जास्तच वाढलं आहे. विशेषतः युवकांमध्ये तर याचं जबरदस्त क्रेज आहे. मात्र स्टंट करणं तितकं सोपंही नाही. यासाठी तितकीच मेहनत आणि सराव करावा लागतो.

चिमुकलीला पाहाताच चवताळली मेंढी; धावत येत केला हल्ला अन्..., धडकी भरवणारा VIDEO

काही लोक तर असेही असतात जे अगदी धोकादायक ठिकाणी आणि कमी जागेतही संपूर्ण आत्मविश्वासासोबत स्टंट करतात. सोशल मीडियावर सध्या एक असाच व्हिडिओ व्हायरल (Dangerous Stunt Video Viral) होत आहे. यात एक व्यक्ती घातक ठिकाणी एक उंच डोंगरावर उभा पाहून ब्लॅकफ्लिप मारताना दिसतो (Backflip on Mountain). व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा व्यक्ती डोंगरावर उभा आहे. या डोंगरावरून खाली पाहिल्यास एक खोल दरी दिसते. इथून खाली पडल्यास जिवंत राहाणंही अशक्य वाटतं.

हा मुलगा या डोंगराच्या अगदी कडेला उभा राहातो. यानंतर तो जीव धोक्यात घालून ब्लॅकफ्लिप मारतो आणि एकदम बरोबर ठिकाणी लँड होतो. त्याचा थोडाही बॅलन्स बिघडला असता तरी त्याला आपला जीव गमवावा लागला असता. तो डोंगरावरुन सरळ दरीत कोसळला असता. मात्र या घातक ठिकाणीही न घाबरता त्याने या पद्धतीने स्टंट केला, ते पाहून जाणवतं की यासाठी त्याने भरपूर मेहनत घेतलेली असणार.

म्हशींला पाहून सिंहाची हवा टाईट; जीव वाचवण्यासाठी काय केलं पाहाच, VIDEO

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ havenreels नावाच्या अकाऊंटवरुन शेअर कऱण्यात आला आहे. आतापर्यंत 5 लाख 42 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर 17 हजारहून अधिकांनी लाईकही केला आहे. लोकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, नक्कीच याच्या आयुष्यात याला कोणीच जवळचं नसेल, यामुळेच हा इतका घातक स्टंट करतोय. तर आणखी एकाने लिहिलं, सोशल मीडियावर फक्त काही लाईक्स मिळवण्यासाठी आपला जीव धोक्यात का टाकतात.

First published:

Tags: Shocking video viral, Stunt video